Join us

कांदा रोपवाटिकेवरील रोग, किडींचा जीवनक्रम तोडण्यासाठी काय कराल, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 19:58 IST

Kanda Ropvatika :  कांदा रोपवाटिकेत एकात्मिक पीक संरक्षण महत्वाचे असते, कारण....

Kanda Ropvatika :    कांदा रोपवाटिकेत एकात्मिक पीक संरक्षण (Integrated Pest Management - IPM) म्हणजे विविध कीड आणि रोग नियंत्रणासाठी एकाच वेळी अनेक पद्धतींचा अवलंब करणे. यात रासायनिक कीटकनाशके, जैविक नियंत्रण, पिकांची फेरपालट, आणि योग्य व्यवस्थापन यांचा समावेश होतो. 

एकात्मिक पीक संरक्षण

  • हंगामानुसार एखाद्या भागात लागवड एकाच आठवड्यात पूर्ण करावी. 
  • दोन हंगामांमध्ये अधिक काळ अंतर राखून रोग, किडींचा जीवनक्रम तोडता येईल.
  • रोपांची मुळे पुनर्लागवडीच्या दोन तास अगोदर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम व कार्बोसल्फान २ मि.ली. प्रति लिटर पाणी या द्रावणात बुडवून नंतरच पुनर्लागवड करावी.
  • फवारणी करताना द्रावणात चिकट द्रव्याचा ०.६ मि.ली. प्रति लिटर पाणी याप्रमाणे वापर करावा.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापन