Join us

Kanda Crop Management : कांदा बीजोत्पादनाचे उभे पीक असताना असे करा व्यवस्थापन, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:18 IST

Kanda Crop Management : बीजोत्पादन केलेल्या कांद्याचे पीक उभे असताना काळजी घेणे महत्वाचे असते. 

Kanda Crop Management : कांदा हे पीक (Kanda Lagvad) अतिशय संवेदनशील पीक आहे. हे पीक राज्यातील नाशिक (Nashik), सोलापूर यासह इतर जिल्ह्यात घेतले जात असल्याने मोठा शेतकरी वर्ग या पिकाशी जोडला गेला आहे. अशात बोगस बियाण्यांचा विक्रीचा प्रकार उघडकीस येत असतो. अशावेळी काही शेतकरी स्वतः बी तयार करण्यावर भर देतात. याच बीजोत्पादन केलेल्या कांद्याचे पीक उभे असताना काळजी घेणे महत्वाचे असते. 

कांदा बीजोत्पादनाचे उभे पीक

  • पुनर्लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी खुरपणी करावी.
  • नत्र खताचा पहिला हप्ता १२ किलो प्रति एकर या प्रमाणात लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा.
  • नत्र खताचा दुसरा हप्ता १२ किलो प्रति एकर या प्रमाणात लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा.
  • पिकास जमिनीचा मगदूर, तापमान यांचा विचार करून १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

 

पीक संरक्षण

  • मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस १ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. 
  • यामुळे पानांवरील रोग आणि फुलकिडे यांचे नियंत्रण होईल.
  • पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने, हेक्झाकोनॅझोल १ मिली अधिक कार्बोसल्फान १ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात करावी.
  • वरील फवारणीनंतर सुद्धा पानांवरील रोग आणि फुलकिडे यांचे नियंत्रण झाले नाही, तर प्रोपीकोनॅझोल १ ग्रॅम अधिक फिप्रोनील १ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम किंवा थायरम २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावणाची आळवणी करावी.
  • फुले उमलल्यानंतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांच्या फवारण्या करू नयेत. 
  • कारण या फवारण्यांमुळे मधमाश्यांना हानी पोहोचते. त्याचा परागीकरणावर विपरीत परिणाम होतो.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापन