Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > बांधकाम नकाशा हाच आता एनए परवानगी म्हणून ग्राह्य धरणार, तो कसा आणि कुठे मिळेल? 

बांधकाम नकाशा हाच आता एनए परवानगी म्हणून ग्राह्य धरणार, तो कसा आणि कुठे मिळेल? 

Latest News Jamin NA Parvangi construction map will now be accepted as NA permission see application proccess | बांधकाम नकाशा हाच आता एनए परवानगी म्हणून ग्राह्य धरणार, तो कसा आणि कुठे मिळेल? 

बांधकाम नकाशा हाच आता एनए परवानगी म्हणून ग्राह्य धरणार, तो कसा आणि कुठे मिळेल? 

Jamin NA Parvangi : नगररचना विभागाने मंजूर केलेला बांधकाम नकाशा हाच आता NA परवानगी म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे.

Jamin NA Parvangi : नगररचना विभागाने मंजूर केलेला बांधकाम नकाशा हाच आता NA परवानगी म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे.

Jamin NA Parvangi : महाराष्ट्र सरकारच्या नवीन निर्णयानुसार, आता बिगर शेती (NA) परवानगीसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. नगररचना विभागाने मंजूर केलेला बांधकाम नकाशा हाच आता NA परवानगी म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. मग ही बांधकाम नकाशा परवानगी कशी आणि कुठे मिळेल, याबाबत थोडक्यात समजून घेऊयात... 

महाराष्ट्रात घर किंवा कोणत्याही इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नगररचना विभाग किंवा स्थानिक प्राधिकरणाकडून (महानगरपालिका/नगरपालिका) अधिकृत बांधकाम नकाशा परवानगी घेणे बंधनकारक असते. 

नकाशा परवानगीची महत्त्वाची प्रक्रिया 

  • नोंदणी : सर्वप्रथम MahaVastu BPMS पोर्टलवर अर्जदार किंवा त्यांच्या वास्तुविशारदाची नोंदणी करणे आवश्यक आहे. 
  • नकाशा तयार करणे : वास्तुविशारद 'TP Client' सॉफ्टवेअरचा वापर करून नियमांनुसार बांधकामाचा नकाशा तयार करतात. 
  • कागदपत्रे अपलोड करणे : आवश्यक कागदपत्रांसह नकाशा ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केला जातो. 
  • शुल्क भरणे : अर्जाच्या छाननीसाठी ऑनलाइन फी भरावी लागते. 
  • तपासणी आणि मंजुरी : नगररचना विभागाचे अधिकारी नकाशाची पडताळणी करतात आणि सर्व नियम पाळले असल्यास डिजिटल स्वाक्षरीने परवानगी प्रमाणपत्र दिले जाते. 

आवश्यक कागदपत्रे 

  • मालकी हक्क पुरावा : सातबारा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड
  • जमीन मोजणी नकाशा : भूमी अभिलेख विभागाने दिलेला मोजणी नकाशा
  • वास्तुविशारद प्रमाणपत्र : नोंदणीकृत आर्किटेक्टचे परवाना प्रत
  • कर पावती : चालू वर्षाची घरपट्टी किंवा मालमत्ता कर भरल्याची पावती  
  • NOC : अग्निशमन दल, पर्यावरण विभाग किंवा विमानतळ प्राधिकरणाचे (आवश्यकतेनुसार) ना हरकत प्रमाणपत्र. 

 

अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम नकाशा परवानगी प्राप्त करू शकतात. कारण यापूर्वी वरील परवानगी घेतल्यांनंतर देखील अकृषक परवानगी म्हणजेच एनए परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे चकरा माराव्या लागत होत्या. मात्र नव्या निर्णयामुळे नागरिकांचे हेलपाटे वाचणार आहे. 
 

Web Title : भवन निर्माण नक्शा ही अब एनए अनुमति: कैसे और कहाँ प्राप्त करें?

Web Summary : महाराष्ट्र के नए नियम के अनुसार, भवन निर्माण योजना अनुमोदन को एनए अनुमति के साथ मिला दिया गया है। महा वास्तु बीपीएमएस पोर्टल के माध्यम से नगररचना विभाग या स्थानीय प्राधिकरण से भवन निर्माण योजना प्राप्त करें। आवश्यक दस्तावेजों में संपत्ति कार्ड, भूमि मानचित्र, वास्तुकार का लाइसेंस, कर रसीद और एनओसी शामिल हैं। इससे अलग एनए आवेदन प्रक्रिया समाप्त हो जाती है।

Web Title : Building plan now NA permission: How and where to get it?

Web Summary : Maharashtra's new rule merges building plan approval with NA permission. Obtain building plan from নগররचना विभाग or local authority via MahaVastu BPMS portal. Required documents include property card, land map, architect's license, tax receipt, and NOCs, if needed. This eliminates separate NA application process.