Onion Crop : सध्या सर्वदूर पाऊस हजेरी लावत आहेत. अशा परिस्थितीत अनेक शेती पिकांचे नुकसान होते आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडत आहे.
त्यामुळे कांदा पिकाला फटका बसला आहे. कांदा रोपवाटिकेमध्ये मर रोग (damping off) येण्याची शक्यता आहे. या काळात काय काळजी घ्यावी, हे समजून घेऊयात...
जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा विरिडी शेणखतांमध्ये मिसळून रोपांमध्ये टाकावा.
त्यानंतर ४ ते ५ दिवसांनी कॉपर ऑक्सी क्लोराईड 1 ग्रॅम/लिटर + त्यामध्ये कासूगामायसीन ०.५ ग्रॅम/लिटर प्रमाण घेऊन फवारणी करावी.
तसेच कांदा लागवड केलेल्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात जांभळा करपा किंवा पीळ रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
तरी शेतकरी बांधवांनी पुढील प्रमाणे बुरशीनाशकाच्या आलटून पालटून फवारणी घ्याव्या.
झेड -७८ १ ग्रॅम/लिटर किंवा टेब्यूकोण्याझोल १ मिली/लिटर किंवा बेनलेट १ ग्रॅम /लिटर व सोबत त्यामध्ये विद्राव्य खत १३:००:४५ ५० ग्रॅम/पंप प्रमाण घेऊन फवारणी करावी.
- विशाल चौधरी, विषय विशेषज्ञ, पिक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव
