Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंबा बागेवरील किडींची ओळख, असे करा आंब्यावरील तुडतुड्यांचे नियंत्रण, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:29 IST

Mango Farming : आजच्या भागातून आंब्यावरील तुडतुडे किडीच्या प्रादुर्भाव व त्याच्या नियंत्रणाची माहिती घेऊयात... 

Mango Farming : भारतीय वंशाच्या प्राचीन फळांपैकी एक आपला देश आंब्यांचा सर्वाधिक उत्पादक आणि निर्यात करणारा आहे. व्हिटॅमिन ए आणि सी समृध्द गोड आणि रसदार फळे महाराष्ट्रात कोकण प्रदेश प्रमुख उत्पादक आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची (केशर) लागवड होत आहे.

आंब्यावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची कारणे

  • व्यावसायिक लागवड
  • लागवड क्षेत्रात वाढ
  • पीक पद्धती मध्ये बदल
  • विविध भागातील जातीची लागवड
  • रासायनिक घटकांचा वापर
  • हवामान बदल

आंबा पिकावरील किडी

आंबा पिकावर जगभरात ४०० हून अधिक प्रजातींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यापैकी १८८ प्रजाती भारतातून नोंदवल्या गेल्या आहेत. त्यापैकी आजच्या भागातून आंब्यावरील तुडतुडे किडीच्या प्रादुर्भाव व त्याच्या नियंत्रणाची माहिती घेऊयात... 

तुडतुडे

खादय वनस्पती : आंबा, चिकू

 कमी अंतरावर लागवड केलेल्या बागेमध्ये जास्त प्रादुर्भाव                                                                                                                           त्यांना ओलसर आणि अंधुक जागा आवडतात आणि त्यांची संख्या दुर्लक्षित आणि पाणी साचलेल्या फळबागांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढते.

  • ही कीड वर्षभर दिसून येते.
  • ऑक्टोबर - जानेवारीच्या थंड महिन्यांत केवळ प्रौढ खोडावर मोठ्या संख्येने बसलेले आढळून येतात.
  • हिवाळ्यात जगलेले प्रौढ त्यानंतर फुलोऱ्यातून रस शोषण करतात.
  • मादी फुलांचे देठ, कळ्या किंवा कोमल पानांच्या पेशीमध्ये टोकदार अवयवाद्वारे अंडी घालते.
  • एक मादी सुमारे १०० ते २०० अंडी देते.
  • अंडी अवस्था : ४-७ दिवस
  • पिल्लावस्था : १०-२० दिवस
  • वर्षभरात २ पिढया निर्माण होतात.
  • थंडी व १०-१५ अंश से. तापमान यानंतर जास्त प्रमाणात अंडी घातली जाते.

 

तुडतुडे नुकसानीचा प्रकार

  • अंडी घालण्याच्या टोकदार अवयवामुळे नुकसान
  • प्रौढ व पिल्ले फुलोरा व पानातून रस शोषण करतात
  • शरीरातून चिकट द्राव सोडल्यामुळे काळ्या बुरशीची वाढ
  • प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम
  • फुल व फळ धारणेवर परिणाम
  • २५ ते ६० टक्के नुकसान

 

तुडतुडे व्यवस्थापन

  • दाट लागवड करणे टाळा, झाडाच्या एकमेकात शिरलेल्या फांद्या पावसाळ्यानंतर छाटन घ्याव्यात. 
  • बागेत पुरेसा सूर्यप्रकाश राहील अशाप्रकारे फांद्याची विरळणी करावी.
  • नियमित नांगरणी करून तण काढून फळबागा स्वच्छ ठेवा.
  • नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर टाळावा.
  • पिकाचे अवशेष / शेण जाळून फळबागेत संध्याकाळी धूर करावा.
  • मित्र कीटकांचे संवर्धन करावे.
  • मेटाहायझियम अनीसोप्लि किंवा बिव्हेरिया बॅसियाना या जैविक बुरशीची फवारणी करावी.
  • बिगर हंगामात खोडावर एक वेळा आणि फुलोऱ्यात 15 दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.

 

- डॉ. बस्वराज वि. भेदे, सहायक प्राध्यापक (कीटकशास्त्र) कापूस संशोधन केंद्र, नांदेड.  

    (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

English
हिंदी सारांश
Web Title : Mango Hopper Control: Identify Pests, Protect Your Mango Orchard

Web Summary : Mango orchards face hopper infestations due to various factors. Control includes pruning, sanitation, avoiding excess nitrogen, and using organic solutions like *Metarhizium anisopliae* or *Beauveria bassiana*. Dr. Bedhe advises regular sprays for effective management and preventing significant yield loss.
टॅग्स :आंबापीक व्यवस्थापनकृषी योजनाशेती