Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > जन्म नोंद हरवली तर पुन्हा जन्माचा दाखला कसा मिळेल, काय कागदपत्रे लागतील, वाचा सविस्तर 

जन्म नोंद हरवली तर पुन्हा जन्माचा दाखला कसा मिळेल, काय कागदपत्रे लागतील, वाचा सविस्तर 

Latest News how to get new birth certificate, what documents are required, read in detail | जन्म नोंद हरवली तर पुन्हा जन्माचा दाखला कसा मिळेल, काय कागदपत्रे लागतील, वाचा सविस्तर 

जन्म नोंद हरवली तर पुन्हा जन्माचा दाखला कसा मिळेल, काय कागदपत्रे लागतील, वाचा सविस्तर 

Birth Certificate Missing : कुठलेही कागदपत्रे काढायचं ठरलं तर सर्वात आधी जन्म दाखला असणे आवश्यक असते.

Birth Certificate Missing : कुठलेही कागदपत्रे काढायचं ठरलं तर सर्वात आधी जन्म दाखला असणे आवश्यक असते.

Birth Certificate Missing : आज कुठल्याही शासकीय कामासाठी कागदपत्रांची आवश्यकता झाली आहे. यापैकी कुठलेही कागदपत्रे काढायचं ठरलं तर सर्वात आधी जन्म दाखला असणे आवश्यक असते. जर हाच जन्म दाखला म्हणजे नोंद हरवली तर... 

जन्म दाखला हरवला म्हणजे तुमच्या जन्माची नोंद हरवल्यासारखे असते. अशावेळी तुम्हाला तुमची ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका कार्यालयात अर्ज करावा लागेल. आता ऑनलाइन 'आपले सरकार' पोर्टलद्वारे अर्ज करता येतो, तर ऑफलाइनसाठी संबंधित कार्यालयात फॉर्म भरावा लागतो. 

आवश्यक प्रक्रिया :
कार्यालयीन संपर्क :
तुमच्या गावातील ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात जा.
अर्ज मिळवा : कार्यालयातून जन्माच्या नोंदीच्या डुप्लिकेट कॉपीसाठी अर्ज (फॉर्म) घ्या.

आवश्यक कागदपत्रे : 

  • अर्जदार/पालकांचा ओळख पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड).
  • पत्त्याचा पुरावा
  • मूळ जन्माच्या नोंदीचा पुरावा (असल्यास).
  • हॉस्पिटलमधून मिळालेले जन्माचे प्रमाणपत्र (असल्यास).
  • शपथपत्र (आवश्यकतेनुसार).

 

अर्ज सादर करा : सर्व कागदपत्रांसह अर्ज कार्यालयात जमा करा आणि शुल्क भरा.
ऑनलाइन पर्याय : काही ठिकाणी Aaple Sarkar या पोर्टलवरूनही अर्ज करता येतो. 

महत्त्वाचे मुद्दे :
नाव समाविष्ट करणे :
जर तुमच्या जन्माच्या नोंदीमध्ये नाव नसेल, तर तुम्हाला ते नाव समाविष्ट करण्यासाठी वेगळी प्रक्रिया करावी लागते, ज्यासाठी अतिरिक्त कागदपत्रे (जसे की शपथपत्र) लागू शकतात.
नवीन कायद्यानुसार : जन्म दाखला आता सर्व सरकारी कामांसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे, त्यामुळे त्याची नोंद असणे आवश्यक आहे. 

अधिक माहितीसाठी तुमच्या ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद, नगरपालिकेत जाऊन भेट द्या. 


 

Web Title : जन्म प्रमाण पत्र खो गया? डुप्लिकेट पाने का तरीका यहां है

Web Summary : जन्म प्रमाण पत्र खो गया? अपने ग्राम पंचायत, नगरपालिका या निगम में आवेदन करें। आईडी, पता प्रमाण और कोई भी मूल जन्म रिकॉर्ड के साथ आवेदन जमा करें। आपले सरकार पोर्टल के माध्यम से ऑनलाइन विकल्प उपलब्ध हैं। बाद में नाम जोड़ने के लिए एक अलग प्रक्रिया की आवश्यकता होती है।

Web Title : Lost Birth Certificate? Here’s How to Get a Duplicate

Web Summary : Lost your birth certificate? Apply at your local Gram Panchayat, Municipality, or Corporation. Submit the application with ID, address proof, and any original birth records. Online options are available via Aaple Sarkar portal. Adding a name later requires a separate process.