Join us
Daily Top 2Weekly Top 5

Agriculture News : कोबीवर्गीय पिकांवरील मावा नियंत्रण कसे करावे, काय-काय फवारणी करावी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 20:31 IST

Agriculture News : कोबीवर्गीय पिकांवरील मावा (Aphids) ही एक महत्त्वाची रसशोषक कीड असून....

Agriculture News :    कोबीवर्गीय पिकांवरील मावा (Aphids) ही एक महत्त्वाची रसशोषक कीड असून, ती कोवळी पाने खाऊन पिकाचे नुकसान करते, ज्यामुळे पाने पिवळी पडून सुरकुततात व त्यांच्यावर काळी बुरशी वाढते. या किडीची लक्षणे काय आहेत, उपाय काय करावेत हे समजून घेऊयात.... 

कोबीवर्गीय पिके- मावा

  • सध्याचे थंड आणि मधूनच ढगाळ होणारे वातावरण मावा प्रादुर्भावास अनुकूल आहे. 
  • हिरव्या किंवा काळ्या रंगाचे मावा कोवळ्या पानातील अन्नरसाचे शोषण करतात. 
  • त्यामुळे पाने सुरकुतल्यासारखी होऊन पिवळी पडतात आणि वाळून जातात. 
  • मावा शरीरातून चिकट पदार्थ बाहेर टाकतात. 
  • हा पदार्थ पानावर साठून राहिल्याने पाने चिकट व तेलकट दिसतात. 
  • त्यानंतर या पदार्थावर काळी बुरशी वाढते. परिणामी, प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. 
  • झाडांची वाढ खुंटून उत्पादनात घट येते.

व्यवस्थापन

  • मावा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीला पोहचल्यास, निंबोळी अर्क ५ टक्के किंवा कडूनिंबावर आधारित कीडनाशक अझाडिरॅक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 
  • या फवारणीमुळे मावा किडीचे प्रमाण कमी होते व मित्र किटकांचे संवर्धन होते.
  • जैविक कीटकनाशकांमध्ये व्हर्टिसिलीअम लेकॅनी किंवा मेटॅन्हायझीयम ॲनिसोप्लीची २ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • गरज पडल्यास व जैविक नियंत्रण केले नसल्यास आणि प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे गेल्यास, रासायनिक कीटकनाशक मॅलॅथिऑन (५० ईसी) २ मि.ली. किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.४ मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळन फवारणी करावी. 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Cabbage Aphid Control: Identification, Prevention, and Spraying Techniques Explained

Web Summary : Aphids damage cabbage crops by feeding on leaves, causing yellowing and black mold. Manage infestations with neem oil, Verticillium lecanii, or chemical insecticides like malathion. Early intervention is key to preventing significant yield loss. Monitor plants regularly for signs of aphid activity and take action when economic thresholds are reached.
टॅग्स :शेती क्षेत्रभाज्यापीक व्यवस्थापनशेती