Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोकरा योजनेतून वैयक्तिक लाभासाठी किती अनुदान मिळते, पहा लाभनिहाय मिळणारे अनुदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 19:35 IST

Pokara Yojana : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) योजनेंतर्गत वैयक्तिक आणि सामूहिक लाभ दिले जातात.

Pokara Yojana :    नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) महाराष्ट्रातील निवडक गावातील शेतकऱ्यांना जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, सेंद्रिय शेती, शेततळे, ट्रॅक्टर, आणि पीक फेरपालट यांसारख्या विविध कामांसाठी ५० टक्के ते ७५ टक्क्यांपर्यंतचे अर्थसहाय्य (अनुदान) थेट डीबीटी (DBT) द्वारे मिळते. 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) योजनेंतर्गत वैयक्तिक आणि सामूहिक लाभ दिले जातात. यातील वैयक्तिक लाभाच्या बाबीसाठी नेमके किती अनुदान दिले जाते. ते थोडक्यात समजून घेऊयात... 

अ. क्र.घटकाचे नांवपात्रता / निकष अनुदान             शेरा
१ पाईपएस.सी/एस.टी. वर्गातील शेतकरी३० हजार रुपयेकुटुंबात एकच लाभार्थी
२ विद्युत पंप (१० HP पर्यंत)एस.सी/एस.टी. वर्गातील शेतकरी९० टक्के कुटुंबात एकच लाभार्थी
३ शेळी पालनभुमीहिन व्यक्ती, विधवा, परितक्त्या, व घटस्फोटीत महिला७५ टक्के कुटुंबात एकच लाभार्थी
४ ठिबक सिंचनपात्र शेतकरी८० टक्के
५ तुषार सिंचन, मिनी स्प्रिंकलरपात्र शेतकरी८० टक्के
६ वैयक्तिक शेततळेपात्र शेतकरी७५ हजार रुपये३०*३०*३
७ शेततळे अस्तरिकरणपात्र शेतकरी७५ हजार रुपये३०*३०*३
८ विहिर पुर्नभरणपात्र शेतकरी१०० टक्के २२ हजार ११८ रुपये 
९ वृक्ष लागवडपात्र शेतकरी१०० टक्के 
१० फळबाग लागवडपात्र शेतकरी१०० टक्के 
११ बांबु लागवडपात्र शेतकरी१०० टक्के १ लाख २० हजार रुपये, (१ हेक्टर) 
१२ रेशीम उद्योगपात्र शेतकरी७५ टक्के कुटुंबात एकच लाभार्थी
१३ गांडुळ/नाडेप युनिटपात्र शेतकरी५० टक्के 
१४ मत्स पालनशेततळे असणारे शेतकरी४० टक्के 
१५ शेडनेट/पॉलीहाऊस लागवड साहित्यपात्र शेतकरी५० टक्के 

 

पात्र शेतकरी - ०.१० ते ५.०० हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेले शेतकरी. अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या कृषिताई, समुह सहाय्यक, सहाय्यक कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

English
हिंदी सारांश
Web Title : Pokra Yojana: Subsidy Details for Individual Beneficiaries Explained

Web Summary : Pokra Yojana offers 50% to 100% subsidy for individual farmers in selected Maharashtra villages. Benefits include pipes, pumps, drip irrigation, farm ponds, and planting materials. SC/ST farmers and landless women get priority. Contact agriculture officials for details.
टॅग्स :कृषी योजनाशेती क्षेत्रशेतीशेतकरी