Agriculture News : उन्हाळी बाजरी आणि भुईमूग वाढीच्या अवस्थेत असून या काळात पाणी देणे अतिशय महत्वाची गरज असते. त्यामुळे या वाढीच्या अवस्थेत पाण्याच्या किती पाळ्या द्याव्या लागतात, हे समजून घेतले पाहिजे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}भुईमुगाचे पाणी व्यवस्थापन
- उन्हाळी भुईमुगासाठी ७० ते ८० सें.मी. पाणी लागते.
- उगवण चांगली होण्यासाठी पेरणीनंतर ४ ते ५ दिवसांनी हलके पाणी द्यावे.
- त्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या दहा ते बारा पाळ्या द्याव्यात.
- पीक फुलोरा अवस्थेत येईपर्यंत पाण्याचा काहीसा ताण द्यावा.
- आऱ्या जमिनीत घुसण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.
- लागवडीसाठी प्लॅस्टिक आच्छादन तंत्राचा अवलंब केल्यास पाण्याची ४० ते ५० टक्के बचत होते.
- भुईमुगासाठी तुषार सिंचन पद्धत उपयुक्त ठरते. तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होते.
- तसेच पिकाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होऊन पीकवाढीस उपयुक्त ठरते.
बाजरीसाठी पाणी व्यवस्थापन
- पेरणीनंतर ४ ते ५ दिवसांनी हलके (आंबवणीचे) पाणी द्यावे.
- त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार व पिकाच्या वाढीच्या संवेदनक्षम अवस्थेत १० ते १२ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
- पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास, पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळी (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी),
- दुसरे पाणी पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी), तिसरे पाणी दाणे भरतेवेळी (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी सेवा केंद्र, इगतपुरी
English
हिंदी सारांश
Web Title : Summer Pearl Millet & Groundnut: Irrigation Schedule for Optimal Growth
Web Summary : Proper irrigation is crucial for summer pearl millet and groundnut. Groundnut needs 10-12 irrigations, avoiding stress during pod development. Pearl millet requires 5-6 irrigations, prioritizing stages like tillering and grain filling. Drip irrigation saves water.

Web Title : ग्रीष्मकालीन बाजरा और मूंगफली: इष्टतम विकास के लिए सिंचाई कार्यक्रम
Web Summary : ग्रीष्मकालीन बाजरा और मूंगफली के लिए उचित सिंचाई महत्वपूर्ण है। मूंगफली को 10-12 सिंचाई की आवश्यकता होती है, फली विकास के दौरान तनाव से बचें। बाजरा को 5-6 सिंचाई की आवश्यकता होती है, कल्ले और अनाज भरने जैसे चरणों को प्राथमिकता दी जाती है। ड्रिप सिंचाई से पानी की बचत होती है।