Join us

Slurry Filter Scheme : स्लरी फिल्टर युनिट उभारायचं, शासनाकडून 50 टक्क्यांपर्यंत अनुदान, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 18:40 IST

Slurry Filter Scheme : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 'स्लरी फिल्टर युनिट योजना' सुरू करण्यात आली आहे. 

जळगाव : रासायनिक खतांचा वाढता वापर आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 'स्लरी फिल्टर युनिट योजना' सुरू करण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांना हे महत्त्वाचे युनिट खरेदी करण्यासाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. यामुळे शेती अधिक सोपी, कमी खर्चिक होईल, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी दिली.

सेंद्रिय शेती करणाऱ्यांसाठी स्लरी फिल्टर युनिट हे एक वरदान ठरत आहे. हे उपकरण प्रामुख्याने ड्रिप किंवा स्प्रिंकलर सिंचन प्रणालीशी जोडले जाते. या युनिटमध्ये शेण, गोमूत्र आणि इतर सेंद्रिय घटक वापरून तयार केलेले जीवामृत गाळले जाते आणि ते थेट पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचवले जाते. 

यामुळे खतांची बचत होते आणि पिकांना आवश्यक पोषण तत्त्वे योग्य प्रमाणात मिळतात. या तंत्रज्ञानामुळे केवळ पिकांचे उत्पादन वाढत नाही, तर जमिनीची सुपीकताही लक्षणीयरीत्या सुधारते. तसेच, रासायनिक खतांवरील मोठा खर्च टाळता येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीस्तरावरील कृषी विभागाकडे कागदपत्रे सादर कराते लागणार आहे. 

लाभ घेण्यासाठी अर्ज कसा कराल ?या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी पंचायत समिती स्तरावरील कृषी विभागाकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.

आवश्यक कागदपत्रेया योजनेसाठी ७/१२, ८अ उतारा, जनावरे असल्याचा पशुवैद्यकीय अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षकांचा दाखला, अग्रीस्टँक नोंदणी पत्र, बँक पासबुकची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, जात प्रमाणपत्र ही कागदपत्रं आवश्यक. 

अनुदान कसे मिळेल?५०० लिटर क्षमतेच्या युनिटसाठी : १० हजार ७५०५०१ ते ११०० लिटर क्षमतेसाठी :  १४ हजार१३०० ते १५०० लिटर क्षमतेसाठी :  १८ हजार 

 

Bhogwatdar Jamin Kharedi : भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी खरेदी-विक्री करता येतात का? वाचा सविस्तर

टॅग्स :कृषी योजनाशेतीशेती क्षेत्रजळगावसेंद्रिय शेती