Agriculture News : पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात हवामान कोरडे राहील. आकाश पुढील पाच दिवस अंशतः ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २८-३० डिग्री सें. व किमान तापमान १२-१५ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या काळात पिकांची काळजी कशी घ्यावी यासाठी सामान्य कृषी सल्ला देण्यात आला आहे.
ढगाळ हवामानात सामान्य कृषी सल्ला
- नवीन फळझाडांचे रोपे सरकंदा / पेंढा/ पॉलिथिन शीट / बारीक पिशव्याने झाकून ठेवा.
- कोबीवर्गीय पिकांचे गड्डे तयार झाले असल्यास काढणी करावी.
- वाटाणा पिकाची काढणी वेळेवर करावी जेणेकरून त्याची गोडी कमी होणार नाही.
- कीड व रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास तज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य ते उपाय करावेत.
- उन्हाळी टोमॅटो, मिरची व वांगी लागवडीसाठी रोपवाटिका तयार करावी.
- उन्हाळी टोमॅटो, मिरची व वांगी लागवडीसाठी रान तयार करावे.
- भाजीपाला पिकांमध्ये ठिबक सिंचनाचा वापर करावा. त्याचप्रमाणे प्लास्टिक आच्छादनाचा वापर करावा.
- ठिबक सिंचनाचा वापर करतांना संपूर्ण खत मात्रा पिकाचा कालावधी विचारात घेऊन आठवड्याच्या अंतराने ठीबकद्वारे द्यावे.
- लसीची रोगप्रतिकारशक्ती एक वर्षापर्यंत जनावरांच्या शरीरामध्ये राहते. म्हणून मेंढ्यांकरिता शीप पॉक्स व शेळयांकरिता गोट पॉक्स आजाराकरिता तीन महिन्यांवरील सर्व शेळ्या, मेंढ्यांना डिसेंबर-जानेवारी महिन्यात दरवर्षी न चुकता पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
English
हिंदी सारांश
Web Title : Agricultural advice for rabi, fruit, and vegetable crops in cloudy weather.
Web Summary : Cloudy weather expected in Nashik. Protect young plants. Harvest cabbage, peas timely. Prepare nurseries for summer tomato, chili, eggplant. Use drip irrigation and plastic mulching. Vaccinate livestock against sheep and goat pox.

Web Title : बादल वाले मौसम में रबी, फल और सब्जी फसलों के लिए कृषि सलाह।
Web Summary : नाशिक में बादल छाए रहने की संभावना है। छोटे पौधों की सुरक्षा करें। पत्ता गोभी, मटर की समय पर कटाई करें। गर्मी के टमाटर, मिर्च, बैंगन के लिए नर्सरी तैयार करें। ड्रिप सिंचाई और प्लास्टिक मल्चिंग का प्रयोग करें। भेड़ और बकरी पॉक्स के खिलाफ पशुओं का टीकाकरण कराएं।