Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gas New Rules Update : १ मेपासून गॅस मिळवणं सोपं नाही; 'हे' नवे नियम जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:59 IST

Gas Rules Update : १ मेपासून गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार असून, आता ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ (DAC) शिवाय सिलिंडर मिळणार नाही. याशिवाय बुकिंगमध्ये अंतराची अट, ई-केवायसीची सक्ती आणि दरवाढीची शक्यता यामुळे ग्राहकांच्या खिशावरही ताण वाढण्याची शक्यता आहे. नवीन नियमांमुळे गॅस वितरण अधिक पारदर्शक होणार असला तरी सामान्य ग्राहकांना सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.(Gas Rules Update)

Gas New Rules Update : जागतिक घडामोडी आणि इंधन पुरवठ्यातील अनिश्चिततेचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर होताना दिसत आहे.(Gas Rules Update)

१ मेपासून एलपीजी सिलिंडरच्या वितरण आणि बुकिंग प्रक्रियेत महत्त्वाचे बदल लागू होण्याची शक्यता असून, ग्राहकांसाठी 'डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड' (DAC) अनिवार्य करण्यात येणार आहे.(Gas Rules Update)

यामुळे गॅस चोरी रोखणे आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत सिलिंडर पोहोचवणे हा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.(Gas Rules Update)

'डीएसी' कोडशिवाय सिलिंडर मिळणार नाही

नव्या नियमानुसार, गॅस सिलिंडरची डिलिव्हरी घेताना ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपीसारखा 'डीएसी' कोड पाठवला जाईल.

हा कोड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला दिल्याशिवाय सिलिंडरची डिलिव्हरी पूर्ण मानली जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी आपला मोबाईल नंबर गॅस एजन्सीकडे अद्ययावत ठेवणे अत्यावश्यक ठरणार आहे.

बुकिंगसाठी किमान अंतराची अट

सिलिंडरच्या बुकिंगमध्येही बदल करण्यात येणार आहेत. एका डिलिव्हरीनंतर दुसरे बुकिंग करण्यासाठी ग्राहकांना किमान २५ दिवसांचे अंतर ठेवावे लागेल. तर, उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांसाठी हे अंतर ४५ दिवसांपर्यंत असू शकते. या निर्णयामुळे सिलिंडरचा गैरवापर टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सिलिंडर दर १ हजारांच्या पुढे?

मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम एलपीजी दरांवरही दिसून येत आहे. १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत सुमारे ५० ते ६० रुपयांची वाढ होण्याची शक्यता असून, दर १ हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्यावसायिक १९ किलो सिलिंडरच्या दरातही सतत चढ-उतार सुरू आहेत.

जागतिक परिस्थितीचा थेट परिणाम

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशांतर्गत गॅस दरांवर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी काळात दरवाढीचा फटका ग्राहकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बायोमेट्रिक ई-केवायसी बंधनकारक

गॅस कंपन्यांनी बायोमेट्रिक ई-केवायसी पूर्ण करण्यावर भर दिला आहे. जर ग्राहकांचे केवायसी अपडेट नसेल, तर गॅस बुकिंग थांबवले जाऊ शकते किंवा सबसिडी (अनुदान) बंद होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया अधिकृत मोबाईल अॅप्सद्वारे घरबसल्या पूर्ण करता येणार आहे.

ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सूचना

* गॅस एजन्सीकडे मोबाईल नंबर अपडेट ठेवा

* डिलिव्हरीवेळी 'डीएसी' कोड तयार ठेवा

* वेळेत ई-केवायसी पूर्ण करा

* बुकिंगमधील अंतराचे नियम पाळा

१ मेपासून लागू होणारे नवे नियम ग्राहकांसाठी सुरुवातीला त्रासदायक वाटू शकतात, मात्र गॅस वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हे बदल महत्त्वाचे ठरणार आहेत. त्याचबरोबर दरवाढीची शक्यता लक्षात घेता, सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवरही याचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Gas Booking New Rule : १० दिवसांत सिलिंडर घेतला नाही? बुकिंग होणार रद्द! नवा नियम लागू

अधिक वाचा : LPG Gas KYC Scam: गॅस केवायसी अपडेट करताना बँक खाते कसे सुरक्षित ठेवावे? सायबर पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

English
हिंदी सारांश
Web Title : Gas Rules Update: New DAC Code, Booking Changes from May 1

Web Summary : From May 1st, gas delivery requires a DAC code. Booking gaps are mandated. Prices may rise due to global tensions. Update KYC to avoid disruptions.
टॅग्स :शेती क्षेत्रसरकारशेतकरीशेती