Wheat Sowing : गव्हाची बागायती वेळेवर पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. वेळेवर पेरणीसाठी फुले समाधान, त्र्यंबक, तपोवन, फुले सात्विक, एम.ए.सी.एस ६२२२, एम.ए.सी.एस ६४७८, डी.बी.डब्लू. १६८ या सुधारित वाणांचा वापर करावा. पेरणीसाठी प्रती हेक्टर १०० किलो बियाण्यांचा वापर करावा.
बीजप्रक्रियेसाठी...
- पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम (७५% डब्लू. एस. ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी.
- बियाणे वाळवल्यानंतर प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम अझोटोबॅक्टर आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळ विणाऱ्या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
- बियाण्यास गुळाच्या थंड पाण्यात मिसळून चोळावे.
- असे बीजप्रक्रिया केलेले बियाणे तासभर सावलीत सुकवावे आणि मग पेरणी करावी.
- बीजप्रक्रियेमुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.
मावा किडीच्या नियंत्रणासाठी...
- तसेच मावा किडीचा नियंत्रणासाठी थायोमिथोक्झाम ३० एफ. एस. ७.५ मिली प्रति १० किलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
- पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी.
- पेरणी ५ ते ६ सेंमी खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते.
- बागायती वेळेवर गव्हाची पेरणी करतांना दोन ओळीत २० सेंमी अंतर ठेवून करावी.
- पेरणी उभी आडवी अशी दोन्ही बाजूने न करता एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करता येते.
- बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते.
- बागायती वेळेवर पेरलेल्या गहू पिकास पेरताना प्रती हेक्टरी ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
