Farming Tips : एकीकडे मार्च महिन्यातील उन्हाने (Temperature) लाही लाही झाली आहे. अशातच एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुसरीकडे रब्बी हंगामातील काही पिकांची काढणी सुरु आहे, तर काही भागात उन्हाळी हंगामातील पिके तरारली आहेत.
अशातच अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावल्यास मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. खराब हवामानात पिके वाचवण्यासाठी शेतकरी संरक्षक कव्हर, आच्छादन, योग्य ड्रेनेज सिस्टम आणि पीक विमा योजना (Pik Vima Yojana) अशा काही गोष्टींचे नियोजन करू शकता. जेणेकरून पिके अशा धोक्यापासून वाचविता येतील. या लेखातून याबाबत जाणून घेऊयात....
घरात मोठी ताडपत्री असू द्या ज्याप्रमाणे तुम्ही पावसापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी छत्री वापरता, त्याचप्रमाणे पिकांचे खराब हवामानापासून संरक्षण करण्यासाठी ताडपत्रीसारखे संरक्षक कवच वापरले जाते. हे कव्हर फार महाग नाही. या कापडाने किंवा प्लास्टिकने तुम्ही पिकाचे वादळ, गारा, दंव किंवा मुसळधार पावसापासून संरक्षण करू शकता. त्याचप्रमाणे, पिकांना कीटकांपासून वाचवण्यासाठी पॉली टनेल किंवा प्लास्टिक शीटचा वापर करता येतो. कडक सूर्यप्रकाश किंवा उष्णतेच्या लाटेपासून देखील पिकांचे संरक्षण करण्यासाठी ताडपत्री वापरू शकता.
मल्चिंगचा वापरपुढील काही दिवसांत उष्णतेच्या लाटेचा धोका आणखी वाढणार आहे. त्यामुळे पिके जळून जातात. यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करा. यासाठी पिकांसाठी सेंद्रिय मल्चिंगचा वापर करा. वापरावे. यामध्ये पेंढा किंवा पाने वापरली जातात. जमिनीतील ओलावा बाष्पीभवन होऊ नये म्हणून झाडांभोवती पेंढा किंवा पाने पसरवली जातात. आच्छादनामुळे तण वाढण्यापासूनही रोखले जाते. बाजारात मल्च शीट देखील उपलब्ध आहेत, ज्या तुम्ही पिकांवर पसरवू शकता. जेणेकरून त्यांना मुसळधार पाऊस किंवा उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण मिळेल.
पाणी व्यवस्थापनाचे फायदेउन्हाळ्यात कमीत कमी पाण्यात शेती करा. जर उष्णतेच्या लाटेमुळे पीक सुकू लागले तर ठिबक सिंचन तंत्राचा अवलंब करा. शिवाय अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करा. अनेकदा पावसाचे पाणी वाहून जाते, हेच पाणी साठवण्याची तजवीज करा. जेणेकरून उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी वापरता येईल.
हवामान अपडेट असू द्या आजच्या काळात आधुनिक शेतीला प्राधान्य दिले जाते. जमीन, पाणी, खते, पिकांची निवड याचबरोबर हवामानाचा महत्वाचा घटक शेतीसाठी आवश्यक ठरतो. शेतीमध्ये विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. वैज्ञानिक संशोधनानंतर, अनेक स्मार्ट बियाणे आणि स्मार्ट रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. अशा बियाण्यांपासून उगवलेली पिके हवामान अनुकूल, दुष्काळ प्रतिरोधक, कीटक प्रतिरोधक, पूर प्रतिरोधक आणि उष्णतेच्या लाटे प्रतिरोधक असतात. या प्रकारचे बियाणे थोडे महाग आहेत, परंतु तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो. या प्रकारच्या बियाण्यांमुळे तुम्हाला प्रत्येक हंगामात उत्पादन मिळण्याची हमी मिळेल.
पीक विमा योजनेचा लाभ वर नमूद केलेल्या उपायांसोबतच, तुम्ही पीक विमा योजनेतही सहभागी होऊ शकता. कारण अनेकदा खराब हवामानामुळे पिकांना मोठा फटका बसतो. शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. यामध्ये, शेतकऱ्याला योजनेत सहभागी होऊन पीक नष्ट झाल्यास झालेल्या नुकसानाची भरपाई विमा योजना देते. यामध्ये, शेतकऱ्याला दावा करावा लागतो, ज्याची चौकशी केल्यानंतर विमा कंपन्या भरपाई देतात.