विधवा सुनेला तिच्या सासू-सासऱ्यांच्या जमिनीवर थेट हक्क नसतो. तिचा हक्क पतीच्या वाट्याद्वारे मिळतो, म्हणजे पती जिवंत असेपर्यंत आणि मृत्यूनंतरही तो तिच्या हक्कात येतो.
जर तिच्या पतीला मुले नसतील, तर तिच्या मृत्यूनंतर मालमत्तेचा वारसा तिच्या सासरच्या कुटुंबाला मिळेल, असे सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार निश्चित झाले आहे.
विधवा सुनेचे जमिनीवरील हक्क
पतीच्या हक्काद्वारे : सुनेचा जमिनीवरील हक्क तिच्या पतीच्या हक्कांवर अवलंबून असतो. पतीच्या निधनानंतर, सासरच्या मालमत्तेत तिचा काही वाटा मिळवण्यासाठी तिला वारसा हक्क कायद्यावर अवलंबून राहावे लागते.
पतीच्या मालमत्तेवरील हक्क : जर जमीन सासू-सासऱ्यांच्या नावे असेल, तर सुनेला त्या जमिनीवर थेट हक्क नसतो, फक्त ती तिच्या पतीच्या वारसा हक्काने मिळवू शकते.
मुले नसल्यास : जर विधवा सुनेला मुले नसतील आणि तिचा पती वारला असेल, तर तिच्या मृत्यूनंतर, ती मालमत्ता तिच्या माहेरच्यांना न मिळता, तिच्या सासरच्या कुटुंबाला मिळेल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
भरणपोषणाचा हक्क : हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार, सासू-सासऱ्यांकडून भरणपोषण मागण्याचा सुनेला हक्क आहे, पण तो जमिनीच्या मालकी हक्कासारखा नाही. हा हक्क काही विशिष्ट परिस्थितीत लागू होतो.
पुढील दोन शक्यता पाहुयात....
सासऱ्यांच्या निधनानंतर - जर मृत्युपत्र केले असेल, तर...जर सासऱ्यांनी त्यांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेचे मृत्युपत्र केले असेल आणि ती इतर कोणाच्या (उदा. दुसरा मुलगा, मुलगी) नावे केली असेल, तर विधवा सुनेला त्यात वाटा मिळणार नाही. मृत्युपत्र हे वारसाहक्काच्या कायद्यापेक्षा वरचढ ठरते.
सासऱ्यांच्या निधनानंतर- जर मृत्युपत्र केले नसेल, तर...जर सासऱ्यांचे निधन मृत्युपत्र न करता झाले, तर त्यांची मालमत्ता 'हिंदू उत्तराधिकार कायद्या'नुसार वाटली जाते. या कायद्यानुसार, 'आधी निधन पावलेल्या मुलाची विधवा' म्हणजेच सून ही 'प्रथम श्रेणीची वारस' मानली जाते.
कायदेशीर मदत : कायदेशीर प्रक्रियेसाठी वकिलाचा सल्ला घेणे आवश्यक आहे, विशेषतः जेव्हा कुटुंबात वाद असतो.
Web Summary : A widow doesn't have direct rights to her father-in-law's property. Her right is through her deceased husband's share. If no children, the property goes to her in-laws. Legal advice is crucial, especially during family disputes.
Web Summary : एक विधवा का अपने ससुर की संपत्ति पर सीधा अधिकार नहीं है। उसका अधिकार उसके दिवंगत पति के हिस्से के माध्यम से है। कोई संतान न होने पर संपत्ति ससुराल वालों को जाती है। कानूनी सलाह महत्वपूर्ण है, खासकर पारिवारिक विवादों के दौरान।