Drone Pilot : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीने आता करिअरच्या नव्या क्षितिजांना दिशा देणारे डीजीसीए मान्यताप्राप्त रिमोट (Drone) पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. (Drone Pilot)
शेती, सर्वेक्षण, लॉजिस्टिक्स, चित्रिकरण यांसह विविध क्षेत्रांना वेगाने बदलणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानात प्रशिक्षित तज्ज्ञांची वाढती मागणी लक्षात घेऊन विद्यापीठाने हा उपक्रम राबवला आहे.(Drone Pilot)
विद्यापीठाचे घोषवाक्य 'कृषि मूलं हि जीवनम' याच धर्तीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे.(Drone Pilot)
प्रोफेशनल रिमोट पायलट कोर्स
या कोर्समध्ये सिद्धांत, प्रात्यक्षिक आणि सिम्युलेटर यांचे मिश्र प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणाची रचना कशी आहे
वर्ग प्रशिक्षण : २ दिवस
ऑनलाइन सिम्युलेटर प्रशिक्षण : १ दिवस
लहान आणि मध्यम ड्रोन उडवण्याचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण : ६ दिवस
हे सर्व प्रशिक्षण अत्याधुनिक ड्रोन उपकरणे, तज्ञ प्रशिक्षक आणि प्रत्यक्ष सराव यांच्या साहाय्याने केले जाणार आहे.
प्रवेशासाठी पात्रता
किमान १०वी उत्तीर्ण किंवा समतुल्य शिक्षण
वय : १८ ते ६५ वर्षे
मान्यताप्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्र
विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शुल्कात विशेष सवलत देण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
ड्रोन पायलट का व्हावे?
आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात ड्रोनचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ड्रोन पायलटसाठी देशांतर्गतच नव्हे तर जागतिक स्तरावरही प्रचंड मागणी आहे.
विविध क्षेत्रात उच्च वेतनमान
आंतरराष्ट्रीय संधींना मोकळे दार
तंत्रज्ञानावर आधारित स्थिर आणि प्रगत करिअर
सरकारी विभाग, खाजगी कंपन्या, स्टार्टअप क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार
ड्रोन तंत्रज्ञानातील करिअरच्या प्रमुख संधी
शेतीमध्ये अचूक फवारणी, पिकांची पाहणी, रोगनिदान उत्पादनवाढीसह खर्चात बचत.
सर्वेक्षण व मॅपिंग
जमीन मोजणी, पायाभूत सुविधा प्रकल्प, जियो-मॅपिंगसाठी मोठी मागणी.
लॉजिस्टिक्स (ड्रोन डिलिव्हरी)
घरपोच सेवा, वैद्यकीय आपत्कालीन साहित्य वितरण हे भविष्याचे महत्त्वाचे क्षेत्र.
आपत्ती व्यवस्थापन व बचावकार्य
पूर, आग, अडकलेल्या लोकांचा शोध यामध्ये तात्काळ कारवाई.
संरक्षण क्षेत्र
सीमारेषा पाळत, गुप्तचर संचालनात ड्रोनचे वाढते महत्त्व.
हे प्रशिक्षण केंद्रच का निवडावे?
डीजीसीए मान्यताप्राप्त अधिकृत प्रशिक्षण केंद्र
अनुभवी व प्रमाणित प्रशिक्षक
अत्याधुनिक ड्रोन मॉडेल्सवर प्रत्यक्ष प्रशिक्षण
विविध क्षेत्रात व्यापक रोजगार संधी
विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलतीचे शुल्क
प्रशिक्षण पूर्ण केल्यावर मान्यताप्राप्त प्रमाणपत्र
प्रवेश सुरू – आत्ताच नावनोंदणी करा!
पत्ता : कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, वनमकवी, परभणी, महाराष्ट्र -४३१४०२
संपर्क : ७७७४८४५९९४ / ९०६९६७१४२
ई-मेल : vnmkv.rpto@gmail.com
