Join us

Draksh Bag Rikat : नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकटची तयार करताय, 'ही' बातमी तुमच्यासाठी, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 12:49 IST

Draksh Bag Rikat : द्राक्ष बागेत रिकट (Draksh Bag Rikat) घेणे म्हणजे काय तर नवीन द्राक्ष बाग असताना रिकट घेतली जाते.

Grape Farming :द्राक्ष बागेत रिकट (Draksh Bag Rikat) घेणे म्हणजे काय तर नवीन द्राक्ष बाग असताना रिकट घेतली जाते. यामुळे बाग एकसारखी वाढण्यास मदत होते. कारण द्राक्ष प्रत्येक वेलीचा खोड ओलांडा तयार होऊन एकसारख्या मालकाड्या तयार होणे आवश्यक असते. त्यामुळे द्राक्ष रिकट (Grape Orchard Management) घेत असताना काय काळजी घ्यावी लागते,हे समजून घेऊया.... 

द्राक्ष बागेत रिकटची तयारी

  • रिकट घेण्यापूर्वी बागेत वेलीला ८-१० दिवस पाण्याचा ताण देणे गरजेचे असेल. 
  • दोन वेलींमध्ये उपलब्ध अंतरावर ३-४ इंच खोल चारी काढून घ्यावी. 
  • या चारीमध्ये शेणखत व शिफारशीनुसार अन्नद्रव्यांच्या मात्रा द्याव्यात.
  • पहिल्या वर्षाच्या बागेत नवीन निघालेल्या फुटींवर फेरसची कमतरता जास्त प्रमाणात दिसून येते. 
  • यासाठी फेरस सल्फेट साधारण १० ते १२ किलो प्रति एकर याप्रमाणात चारीत मिसळून घ्यावे.
  • बऱ्याच द्राक्ष लागवडीखालील जमिनींत चुनखडीचे प्रमाण कमी अधिक दिसून येते. 
  • त्याकरिता सल्फर ४० ते ६० किलो प्रति एकर याप्रमाणे शेणखतात मिसळून बोदामध्ये टाकावे.
  • रिकट घेतल्यानंतर एकसारखी फूट निघण्याकरिता पानगळ ही तितकीच महत्त्वाची असते. 
  • वेलीला पाण्याचा ताण बसल्यास पानगळ लवकर होऊन डोळे फुटतील किंवा कलम जोडाच्या वर ज्या ठिकाणी रिकट घेणार आहोत, तेथील पाने हाताने गाळून घ्यावीत किंवा इथेफॉन ३ मि.ली. अधिक ०:५२:३४ हे विद्राव्य खत ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करून घ्यावी. 
  • यामुळे पानगळ सहजरीत्या होईल. तसेच रिकट घेतल्यानंतर एकसारखी व लवकर फूट निघण्यास मदत होईल.
  • डोळे एकाचवेळी फुटण्याकरिता हायड्रोजन सायनामाइड ३० ते ४० मि.ली. याप्रमाणे प्रति लिटर पाण्यात मिसळून पेस्टिंग करावे. 
  • काडी जास्त जाड असल्यास तितक्याच मात्रेत दोनवेळा पेस्टिंग करावे.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपूरी 

टॅग्स :द्राक्षेशेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापनकृषी योजना