Dalimb Farming : डाळिंबावर (Pomegranate) सूत्रकृमी (नॅमॅटोड) चा प्रादुर्भाव (Nametod) झाल्यास झाडाच्या मुळांवर गाठी येतात आणि झाड अशक्त होते, ज्यामुळे फुलधारणा कमी होते. सूत्रकृमीचे नियंत्रण करण्यासाठी योग्य उपाय करणे आवश्यक आहे.
- सूत्रकृमींचा अधिक प्रादुर्भाव हा झाडाच्या ड्रिपरच्या खाली असलेल्या पांढऱ्या किंवा नवीन मुळांवरील गाठींवरून स्पष्ट होतो.
- सूत्रकृमींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास विश्रांती काळात किंवा बहर नियमनाच्या वेळी सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीचा अवलंब करावा.
- प्रत्येक ड्रीपर खाली ५ ते १० सें.मी. खोल खड्डा करून त्यामध्ये फ्लूएनसल्फोन (२ जीआर) १० ग्रॅम टाकून मातीने झाकून टाकावे.
- फ्लूएनसल्फोनची मात्रा जास्तीत जास्त ४० ग्रॅम प्रति झाड इतकी वापरावी. त्यानंतर हलके पाणी द्यावे किंवा
- फ्लूओपायरम (३४.४८ एससी) २ मि.ली. प्रति झाड या प्रमाणे ट्रेंचिंग करावे.
- ट्रेंचिंग करण्यापूर्वी झाडांना पुरेसे पाणी द्यावे.
- प्रत्येक झाडासाठी २ लिटर पाण्यामध्ये २ मि.ली. फ्लूओपायरम हे द्रावण ५०० मि.ली. प्रति ड्रिपर (जर एका झाडाला चार ड्रिपर असतील) किंवा १००० मि.ली. प्रति ड्रिपर (जर एका झाडाला दोन ड्रिपर असतील) मिसळून ट्रेंचिंग करावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी