Join us
Daily Top 2Weekly Top 5

थंडीमुळे द्राक्ष बागेवर परिणाम अन् द्राक्षघडावर भुरी रोग, कसा कराल उपाय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 19:54 IST

Agriculture News : थंडी जास्त असल्यास रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.

Agriculture News :    द्राक्ष वेलीवरील परिणाम अतिथंडीमुळे मुळांची वाढ मर्यादित होते, त्यामुळे पाने लहान व पातळ राहतात. शेड्यांची वाढ थांबते आणि कॅनोपी कमकुवत होते. पोटॅश, कॅल्शिअम व फॉस्फरस यांचे शोषण कमी होते, परिणामी मण्यांवर विकृती दिसून येतात. थंडी जास्त असल्यास रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.

रोग नियंत्रण

  • कमी तापमानामध्ये प्रामुख्याने भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. दाट कॅनॉपी असलेल्या वेलीवर भुरीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसेल. 
  • बऱ्याच ठिकाणी पानाच्या मागे दडलेला द्राक्षघड पूर्णपणे भुरी रोगाने ग्रस्त झालेला दिसून येईल. 
  • या वेळी द्राक्षबागेत ५० दिवसांनंतर वाढीच्या अवस्थेत आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी करण्याची शिफारस नाही. 
  • यावर उपाययोजना म्हणून स्पर्शजन्य बुरशीनाशकांची धुरळणी करता येईल. 
  • मोकळी कॅनॉपी असलेल्या बागेत ही समस्या कमी प्रमाणात दिसून येते. 
  • कारण या कॅनॉपीमध्ये हवा सतत खेळती राहिल्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण कमी राहते. 
  • त्यामुळे फवारणीचे कव्हरेज चांगले होऊन प्रभावी रोग नियंत्रण होते. 
  • म्हणजेच या कॅनॉपीमध्ये रोगास पोषक वातावरण तयार होत नाही. या वेळी जैविक नियंत्रणावर जोर देता येईल.
  • धुके, पानांवर दवबिंदू जास्त काळ टिकून राहिल्यास पाने जास्त काळ ओली राहतात. 
  • त्यामुळे आर्द्रतासुद्धा वाढते. या काळात डाऊनी मिल्ड्यूसारख्या रोगाचे बीजाणू सक्रिय होतात. 
  • पाणी उतरत असलेल्या परिस्थितीत सुद्धा याचा प्रादुर्भाव दिसून येईल. 
  • अशा वातावरणात भुरी आणि डाऊनी या दोन्ही रोगांचे नियंत्रण गरजेचे असेल. 
  • ज्या बागेत पाने जास्त वेळ ओली राहतात, तेथे स्पर्शजन्य बुरशीनाशकांची धुरळणी करणे फायद्याचे असेल. 
  • यामुळे ओल्या पानांवर जास्त वेळ बुरशीनाशक चिकटून राहील व रोग नियंत्रण सोपे होईल. 
  • कॅनॉपीत वाढलेल्या आर्द्रतेत पाने जास्त काळ ओली नसलेल्या परिस्थितीत जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माच्या तीन-चार फवारण्या करून घेतल्यास प्रभावी रोग नियंत्रण होईल.
  •  

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Grapevine Cold Impact: Manage Powdery Mildew with These Measures

Web Summary : Cold weather impacts grapevines, hindering root growth and increasing disease susceptibility, especially powdery mildew. Improve canopy ventilation, use contact fungicides, and consider biological controls like Trichoderma for effective disease management. Focus on keeping leaves dry to prevent fungal growth.
टॅग्स :द्राक्षेशेतीशेती क्षेत्रनाशिकपीक व्यवस्थापन