Join us

Namo Shetkari Hafta : तुमचा नमो शेतकरी योजनेचा हफ्ता येणार कि नाही, या सोप्या स्टेपद्वारे तपासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 13:37 IST

Namo Shetkari Hafta : शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता येथे एक-दोन दिवसात मिळण्याची शक्यता आहे. 

Namo Shetkari Hafta : राज्यातील नमो शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता येथे एक-दोन दिवसात मिळण्याची शक्यता आहे. 

आता पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे एफटीओ जनरेट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. हा हप्ता आपल्या खात्यामध्ये येणार का तसेच आपला एफटीओ जनरेट झालेला आहे का ते ऑनलाइन पद्धतीने कसं पाहायचं हे समजून घेऊया. 

  • यासाठी NSMNY या संकेतस्थळाला भेट द्या. 
  • या वेबसाईटवर आल्यानंतर Beneficiary Status नावाची विंडो आपल्यासमोर दिसून येईल.
  • या ठिकाणी तीन पर्याय दिसून येतील यामध्ये Registration Number म्हणजेच नोंदणी क्रमांक, दुसरा आधार रजिस्टर मोबाईल नंबर, तिसरा आधार नंबर या तीन पर्यायाद्वारे तुम्ही लॉगिन करू शकतात. 
  • या ठिकाणी पहिल्या रकान्यात मोबाईल नंबर टाकायचा आहे. 
  • खालील रकान्यात कॅपच्या कोड दिलेला आहे. 
  • त्यानंतर गेट आधार ओटीपी (Get Aadhar OTP) या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  • आपला जो आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर असेल त्यावर ओटीपी पाठवला जाईल. 
  • ओटीपी टाकून आपल्याला व्हेरिफाय करायचा आहे. 
  • व्हेरिफाय केल्यानंतर आपल्यासमोर नमो शेतकरी निधी योजनेच्या अंतर्गत  Beneficiary Status पाहायला मिळेल. 
  • ज्यामध्ये शेतकऱ्याचे नाव, मोबाईल नंबर, नोंदणी क्रमांक व इतर माहिती दिसून येईल. 
  • तसेच आपल्याला मिळालेले या आधीचे हप्ते याचाही तपशील पाहायला मिळेल. 
  • तुम्ही जर पाहत असाल तर या विंडोमध्ये एलिजिबिलिटी डिटेल्स (Eligibilty Details) असा पर्याय दिसून येईल.
  • जर इनलिबिलिटी असा पर्याय दिसत असेल तर ते अपात्र असल्याचं समजावे, यामध्ये त्याचं अपात्रतेचे कारण दाखवले जाईल.

तुमचा एफटीओ (FTO) जनरेट झालेला आहे का हे पाहुयात..

  • सर्वप्रथम पी एफ एम एस या पोर्टलवर भेट द्यावी लागेल. 
  • यानंतर पहिली विंडो ओपन होईल. यातील पेमेंट स्टेटस पर्यायातील डीबीटी स्टेटस ट्रॅकर हा पर्याय निवडावा. 
  • हा पर्याय निवडल्यानंतर पुढील विंडोमध्ये कॅटेगिरी निवडायची आहे.
  • यासाठी कॅटेगिरीवर क्लिक केल्यानंतर पुढील पर्यायातील डीबीटी एनएसएमएनवाय पोर्टल हा पर्याय निवडावा.
  • पुढील डीबीटी स्टेटस या पर्यायातील पेमेंट या पर्यायावर क्लिक करून पुढील रकान्यात तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. 
  • त्यानंतर खाली कॅपचा कोड टाकून सबमिट या पर्याय वर क्लिक करायचा आहे. 
  • सबमिट केल्यानंतर पुढील विंडोमध्ये संपूर्ण माहितीचा तपशील दिसून येईल. 

आता ज्या शेतकऱ्याचा एफटीओ जनरेट झालेला नाही. त्यांना जुने ऍक्टिव्ह दाखवले जातील, जसे की शेवटचा हप्तेला हप्ता आलेला आहे, परंतु हप्त्याचा ऍक्टिव्ह जनरेट झालेला नाही किंवा पहिला, दुसरा, तिसरा हप्ता मिळाला. त्याचा एफटीओ दाखवलेले आहेत. परंतु या नवीन हप्त्याचे जनरेट झालेला नाही, तर आपला हप्ता येऊ शकणार नाही किंवा संबंधित शेतकऱ्याला अपात्र करण्यात आले असे समजावे. 

ज्या शेतकऱ्यांचे एफटीओ जनरेट झालेले आहेत, त्या शेतकऱ्यांना एफटीओ जनरेट झाल्याची माहिती दाखवली जाईल. त्यामुळे जे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत सहभागी झालेले आहेत, अशा शेतकऱ्यांनी आपला एफटीओ जनरेट झाला आहे की नाही हे तपासून आपला हप्ता येणार की नाही याबाबत माहिती घ्यावी.

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेती क्षेत्रशेतीकृषी योजना