Join us

Bandhkam Kamgar Yojana : बांधकाम कामगार योजनेचा अर्ज मंजूर की पेंडिंग? असे पहा अर्जाचे स्टेट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 20:13 IST

Bandhkam Kamgar Yojana : बांधकाम कामगार योजनेचे स्टेटस कसे पहावे, हे या लेखातून पाहुयात..

Bandhkam Kamgar Yojana :महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने सर्व बांधकाम कामगारांसाठी (Bandhkam Kamgar) ऑनलाईन 2024 अर्ज करण्यासाठी mahabocw.in बांधकाम कामगार योजना ही सेवा उपलब्ध करून दिली आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांना अर्थ सहाय्य दिले जाते. 

विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी अनेक कामगारांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे. त्यानंतर योजना थांबलेली होती. मात्र आता पुन्हा योजनेला (Kamgar Scheme) गती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण सादर केलेला अर्ज मंजूर झाला की नाही हे तपासणे महत्वाचे आहे. त्यासाठी या लेखातून हे समजून घेऊया... 

असे पहा बांधकाम कामगार योजनेचे स्टेटस 

  • सर्वप्रथम गुगल वर बांधकाम कामगार योजना असे सर्च करावे.
  • यानंतर आपल्यासमोर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची mahabocw.in ही अधिकृत वेबसाईट दिसेल.
  • त्यानंतर आपल्यासमोर अनेक पर्याय दिसतील यातील बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा. 
  • या पर्यायावर क्लिक करा, या ठिकाणी आपला आधार नंबर आणि आपण अर्जासोबत दिलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे. 
  • आणि Proceed To form यावर क्लिक करा.
  • यानंतर आपल्यासमोर तुमच्या अर्जाची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल. 
  • यात तुमचा अर्ज Accept झाला आहे की Pending आहे हेही दिसेल.
  • या रीतीने तुम्ही बांधकाम कामगार योजनेच्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकाल.
टॅग्स :कृषी योजनाशेतीशेती क्षेत्रमहाराष्ट्र