Join us
Daily Top 2Weekly Top 5

Banana Farming : केळी बागेत उष्णतेचा ताण कमी कसा करायचा, 'हे' सहा उपाय दर्जेदार उत्पादन वाढवतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 18:05 IST

Banana Farming : जास्त उन्हामुळे केळीच्या पानांचे जळणे, वाढ खुटोण, फळांचा आक्कार कमी होणे अशा समस्या निर्माण होतात.

Banana Farming :  जास्त उन्हामुळे केळीच्या पानांचे जळणे, वाढ खुटोण, फळांचा आक्कार कमी होणे, कच्ची फळे गळणे, घडाची गुणवत्ता कमी होणे अशा समस्या निर्माण होतात. योग्य उपाययोजना करून उत्पादन व गुणवत्ता वाढवता येते, या उपाययोजना समजून घेऊयात... 

मल्चिंग करा

  • झाडाभोवती सुकी पाने, कार्ड, गवत, ऊसाच्या पाचटाचे आच्छादन करा.
  • मातीतील ओलावा टिकून राहतो.
  • जमिनीचे तापमान कमी राहते.

 

ठिबक सिंचन वापरा

  • ठिबक सिंचनाने पाणी हळूहळू व थेट मुळांजवळ पोहोचते.
  • सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्या.
  • जमिनीत ओलावा कायम राहतो.
  • पाण्याचा ताण येऊ देऊ नका.

 

आंतरपीक/ सावली निर्माण

  • सुरवातीच्या अवस्थेत डाळी पिके (उडीद, मुग) लावा.
  • यामुळे जमिनीवर सावली पडते. तापमान कमी राहते.

 

अॅटी-ट्रान्सपिरंट फवारणी

  • झाओलिन (Kaolin) 5% फवाराणी करा.
  • किंवा सिलिकॉन आधारित अॅटी-ट्रान्सपिरंट वापर.
  • पानांमधून होणारे पाणी बाष्पीभवन कमी होते.

 

घडांचे संरक्षण

  • घडावर कव्हर (Bunch Cover) वापरा (पॉलिथीन/कापड).
  • फळे उन्हामुळे काळी पडत नाहीत व दर्जा चांगला राहतो.

 

वाऱ्यापासून संरक्षण

  • शेताच्या कडेला झाडे / वारा अडवणारे पडदे (Windbreaks) लावा.
  • गरम वाऱ्याचा परिणाम कमी होतो.

 

संतुलित खत व्यवस्थापन

  • POTASH (MOP)
  • पोटॅश (Potash) जास्त प्रमाणात द्या.
  • पोटॅशामुळे झाडाची ताण सहन करण्याची क्षमता वाढते.

 

लक्षात ठेवा :

  • पाने जळलेली दिसल्यास त्वरित पाणी द्या.
  • जमिनीत भेगा पडू देऊ नका.
  • दुपारी फवारणी टाळा.
  • सकाळी किंवा संध्याकाळीच सर्व उपाय करा.

 

- कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर जि हिंगोली

English
हिंदी सारांश
Web Title : Beat the Heat: 6 Ways to Boost Banana Farming Production

Web Summary : High heat damages banana crops. Mulching, drip irrigation, shade, anti-transpirants, bunch covers, windbreaks, and potash fertilizer can help. Water frequently, avoid cracks in the soil, and implement these measures in the morning or evening to increase yield and quality.
टॅग्स :केळीपीक व्यवस्थापनशेतकरीशेती