Join us

Ativrusthi Anudan : दोन मिनिटांत मोबाईलवर तपासा अतिवृष्टी अनुदान स्टेटस, वाचा सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 13:50 IST

Ativrusthi Anudan : अतिवृष्टी झालेल्या बाधित शेतकऱ्यांना (Ativrusthi Anudan) अनुदान वितरण करण्यास सुरुवात झाली आहे.

Ativrusthi Anudan :  नैसर्गिक आपत्तीसह अतिवृष्टी झालेल्या (Ativrusthi Anudan) बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून एक वेळचे निविष्ठा अनुदान दिले जात आहे. आणि यासाठी हजारो शेतकरी पात्र झाले असून कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. आणि याच अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये आणि महसूल मंडळांमध्ये याद्या प्रकाशित करून केवायसी (E kyc) करण्याचं आवाहन केलं जात आहे. यासाठीच्या काही नवीन याद्या आज देखील प्रकाशित झाले आहेत. 

दरम्यान केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना कालपासून (Ativrusthi Anudan) पहिल्या टप्प्यातील अनुदान वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. पाच लाख शेतकऱ्यांना जवळपास 594 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. यापूर्वी देखील जानेवारी महिन्यात अनुदान वितरित करण्यात आले होते तर अद्यापही अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. 

अनेक शेतकऱ्यांनी काही महिन्यांपूर्वीच केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून ते शेतकरी देखील अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. आपण जर केवायसी केलेली असेल आपल्या अनुदानाची सद्यस्थिती काय आहे? ते वितरित झाला आहे का किंवा काही कारणास्तव होल्ड ठेवण्यात आले आहे का? याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात?

  • सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. 
  • यानंतर आपल्याला दिलेला विशिष्ट क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. 
  • यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करायचा आहे. 
  • यानंतर आपल्याला आपल्या पेमेंटची सद्यस्थितीत दाखवली जाईल. 
  • यात पेमेंट झाले आहे का? होल्ड वर ठेवले आहे का? याबाबत सांगितले जाईल. 
  • जर पेमेंटचे वितरण झाले असेल तर किती पेमेंट झाले आहे? कोणत्या बँकेत पेमेंट झाले आहे? कोणत्या तारखेला वितरित झाले आहे? याबाबतचा तपशील आपल्यासमोर दिसेल.
  • जर अद्याप अनुदान वितरित झालेले नसेल तर काही प्रक्रिया पार पाडल्या नसतील तर संबंधित शेतकऱ्याला पेमेंट तपशील उपलब्ध नसल्याचे दाखवले जाईल. 
  • या व्यतिरिक्त काही इतर कारण असेल तहसील कार्यालयाशी संपर्क साधा अशी सूचना देण्यात येईल.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीकृषी योजनापाऊस