Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुमची जमीन आंबा बागेसाठी योग्य आहे का? या गोष्टी तपासून पहा, कोणती जमीन निवडू नये? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 18:35 IST

Amba Lagvad : आंब्याच्या नवीन लागवडीसाठी जमिनीची निवड अतिशय महत्वाची ठरते. 

Amba Lagvad :  आंब्याच्या नवीन लागवडीसाठी जून ते ऑगस्ट (पावसाळ्याची सुरुवात) हा काळ सर्वोत्तम मानला जातो, विशेषतः जिथे पुरेसा पाऊस पडतो. जर पाण्याची उत्तम सोय असेल, तर फेब्रुवारी-मार्च महिन्यांतही लागवड करता येते. लागवड करताना जमिनीची निवड अतिशय महत्वाची ठरते. 

जमीन कोणती निवडावी ?

  • मध्यम काळी, हलकी २.५ ते ३.० फुटावर मुरूम असणारी जमीन सर्वात उत्तम मानली जाते.
  • उत्तम पाण्याचा निचरा होणारी
  • जमिनीची खोली किमान १.५ ते २.५ मीटर असावी.
  • जमिनीचा सामू ५.५ ते ७.५ किंवा ६.५ ते ८ च्या दरम्यान असावा.
  • सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण भरपूर असावे. 

 

कोणती जमीन निवडू नये ?

  • चुनखडीचे प्रमाण ८-१०% पेक्षा जास्त असल्यास आंबा लागवड करू नये.
  • क्षारयुक्त व चोपण जमिनी झाडांच्या वाढीसाठी घातक ठरतात.
  • पृष्ठभागावर लगेच कठीण खडक असणारी जमीन टाळावी.
  • ज्या जमिनीत पाणी साठून राहते (पाणथळ), अशा ठिकाणी मुळे कुजण्याची भीती असते.

 

टीप : लागवडीपूर्वी माती परीक्षण करावे. 

- डॉ. संतोष चव्हाण, संस्कृति संवर्धन मंडळ कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी

English
हिंदी सारांश
Web Title : Is Your Land Suitable for Mango Farming? Check These Factors

Web Summary : Choose well-drained, medium-black soil with a pH of 5.5-7.5 for mango cultivation. Avoid saline, waterlogged, or rocky lands. Soil testing is essential before planting. June to August is ideal for planting.
टॅग्स :आंबाशेती क्षेत्रशेतीशेतकरीपीक व्यवस्थापन