Join us

Agriculture News : वेलवर्गीय भाजीपाला पिकांना आधार देण्याची ताटी पद्धत काय आहे? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 20:43 IST

Agriculture News : या लेखातून आपण भाजीपाला पिकांना आधार देणारी ताटी पद्धत काय आहे? ती कशी उपयुक्त आहे, हे पाहुयात.... 

Agriculture News :  यापूर्वी आपण वेलवर्गीय भाजीपाला पिकांसाठी (Vegetable Crop)  मंडप कशी असते, तिचा फायदा काय होत असतो, हे सविस्तर पाहिले. या लेखातून आपण भाजीपाला पिकांना आधार देणारी ताटी पद्धत काय आहे? ती कशी उपयुक्त आहे, हे पाहुयात.... 

वेलवर्गीय भाजीपाला पिके आधार देण्याची ताटी पद्धत

  • या पद्धतीमध्ये ६०३ फुटांवर वेलवर्गीय भाज्यांची लागवड करतात. 
  • यासाठी रीजरच्या साह्याने ६ फूट अंतरावर सरी पाडावी. प्रत्येक २५ फूट अंतरावर आडवे पाट तयार करावेत. 
  • सऱ्यांच्या लांबीच्या दोन्ही टोकाला १० फूट उंचीचे व ४ इंच जाडीचे डांब शेताच्या बाहेरच्या बाजूला झुकतील. 
  • या पद्धतीने दोन फूट जमिनीत गाडावेत. त्यांना दोन्ही बाजूंना १० गेजच्या तारेने ताण द्यावेत. 
  • नंतर प्रत्येक ८ ते १० फुटांवर आठ फूट उंचीचे दीड इंच जाडीचे बांबू अडीच इंच जाडीच्या लाकडी बल्या जमिनीत गाडून उभ्या कराव्यात. 
  • लावलेल्या वेलामध्ये उभे केलेले बांबू किंवा डांब आणि कडेचे लाकडी डांब एका सरळ रेषेत येतील याची काळजी घ्यावी. 
  • नंतर १६ गेज जाडीची तार जमिनीपासून दोन फूट उंचीवर, दुसरी तार जमिनीपासून सहा फूट उंचीवर ओढावी. 
  • त्यानंतर वेलींची दोन फूट उंचीवर बगलफूट व ताणवे काढून वेल सुतळीच्या साह्याने तारेवर चढवावेत. 
  • बांबू आणि ताराऐवजी शेवरी किंवा इतर जंगली लाकडाचा वापर केल्यास खर्च कमी होऊ शकेल, परंतु ते साहित्य एका हंगामासाठीच उपयोगी पडेल. 
  • बांबू आणि तार जवळजवळ तीन हंगामांसाठीच वापरता येतात. 
  • त्या दृष्टीने विचार केला तर बांबू आणि तारा यांची ताटी केव्हाही स्वस्त पडेल.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :शेती क्षेत्रपीक व्यवस्थापनशेतीभाज्या