Agriculture News : वेलींना वळण देणे म्हणजे त्यांना योग्य दिशेने वाढायला मदत करणे. वेलींना आधार (support) देण्यासाठी आणि त्या व्यवस्थित वाढाव्यात, यासाठी वळण देणे आवश्यक आहे. वेलींना आधार मिळाल्यावर, त्या योग्य दिशेने वाढतात आणि त्यांना जास्त फळे किंवा फुले लागतात, ज्यामुळे उत्पादन वाढते.
वेल वर्गीय पिके (वेलींना वळण)
- मंडप उभारणीचे काम वेल साधारण एक ते दीड फूट उंचीचे होण्यापूर्वी पूर्ण करावे.
- मंडप तयार झाल्यानंतर आठ फूट उंचीची सुतळी घेऊन त्याचे एक टोक वेलाच्या खोडाजवळ तिरपी काडी रोवून त्या काडीस बांधावे.
- त्या सुतळीस पीळ देऊन दुसरे टोक वेलावरील तारेस बांधावे.
- वेल सुतळीच्या साह्याने वाढत असताना बगलफूट व ताणवे काढावेत, पाने काढू नयेत.
- वेलाची पाच फूट उंची झाल्यावर वेलाची बगलफूट व ताणवे काढणे थांबवावे.
- मुख्य वेल मंडपावर पोहोचल्यानंतर त्याचा शेंडा खुडावा व राखलेल्या बगलफुटी वाढू द्याव्यात.
- हवामानाचा अंदाज लक्षात घेता कोरडवाहू जमिनीच्या क्षेत्रात (मालेगाव, कळवण, देवळा, नांदगाव, येवला व सटाणा) वातावरणातील ओलावा संरक्षणासाठी कंपार्टमेंट बांधासारख्या संरचना तयार करा.
- तसेच पडणाऱ्या पावसाचे पाणी शेतात साठवण्यासाठी उपाय योजना करावी.
- उत्तर - पूर्वेकडील (मालेगाव, कळवण, देवळा, नांदगाव, येवला व सटाणा) मैदानी व अवर्षण प्रवण विभागात पडणाऱ्या पावसाचे पाणी शेतात साठवण्यासाठी उपाय योजना करावी.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी