Agriculture News : उन्हाळी पिकांसाठी पाण्याचे योग्य नियोजन आणि सिंचन व्यवस्थापन हे भरघोस उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्याने आणि तापमान वाढल्यामुळे पिकांना पाण्याची गरज सतत भासते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}- उष्ण हवामांचा अंदाज लक्ष्यात घेता उन्हाळी भाजीपाला व फळबागांना शक्यतो सायंकाळी ओलीत करावे, तसेच पिकामध्ये अच्छादनाचा वापर करावा.
- उन्हाळी पिकातील जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी शेतात गवताचे आच्छादन करावे व ठिबक सिंचनाचा अवलंब करावा.
- फळपिकांमध्ये शक्यतो खुरपणी करुन घ्यावी व बोर्डोपेस्ट खोडांना लावावे.
- पिकांना पाणी शक्यतो रात्री द्यावे व उन्हाळी पिके, भाजीपाला व फळबागांमध्ये सूक्ष्म सिंचनाचा (ठिबक व तुषार सिंचन) उपयोग करून पाण्याची बचत करावी. जमिनीची खोल नांगरट करावी त्यामुळे जमिन चांगली तापुन त्यामधील जिवजंतुचा नाश होवुन खरीप पिकातील तणांचे प्रमाण, किड व रोगाचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
- जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी भाजीपाला व फळ झाडांमध्ये मल्चिंग करावी.
- भाजीपाला पिकाला आवश्यकतेनुसार सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी देणे.
- फळ पिकांमध्ये फळे पोसण्यासाठी बोरॉन १.५ ग्राम, कॅल्शिअम ०.७५ ग्राम, मॅग्नेशीअम ३ ग्राम प्रती लिटर पाण्यातून फवारावे.
- साठवण करावयाच्या कडधान्यांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी ३ ते ५ मि.ली. एरंडेल/जवस/करंज/कडुनिंबाचे तेल प्रति किलो धान्य या प्रमाणात वापरावे.
- उष्ण हवामानाचा अंदाज लक्ष्यात घेता तोडणीला आलेल्या भाजीपाला पिकांची त्वरित तोडणी करून घ्यावी.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी
English
हिंदी सारांश
Web Title : Effective Irrigation Management for Summer Crops: Prevent Crop Damage
Web Summary : Manage summer crop irrigation wisely for high yields. Use evening watering, mulching, and drip irrigation. Protect fruit trees, control pests, and harvest vegetables promptly. Conserve water and ensure healthy crops.

Web Title : ग्रीष्मकालीन फसलों के लिए प्रभावी सिंचाई प्रबंधन: फसल नुकसान रोकें
Web Summary : अधिक उपज के लिए ग्रीष्मकालीन फसलों की सिंचाई का प्रबंधन बुद्धिमानी से करें। शाम को पानी दें, मल्चिंग और ड्रिप सिंचाई का उपयोग करें। फल के पेड़ों की रक्षा करें, कीटों को नियंत्रित करें और सब्जियों की तुरंत कटाई करें। पानी का संरक्षण करें और स्वस्थ फसलें सुनिश्चित करें।