Birsa Munda Yojana : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2025 ही महाराष्ट्रातील एक सरकारी योजना आहे. ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आहे. या योजनेत नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळे, सूक्ष्म सिंचन, तुषार सिंचन, आणि सौर पंप यांसारख्या कामांसाठी अनुदान दिले जाते.
योजनेत समाविष्ट असलेल्या योजना :
- नवीन विहीर : 4 लाख रुपयांपर्यंत अनुदान.
- जुनी विहीर दुरुस्ती : 1 लाख रुपयांपर्यंत अनुदान.
- शेततळे : प्रचलित आर्थिक मापदंडानुसार अनुदान.
- सूक्ष्म सिंचन : 97 हजार रुपयांपर्यंत अनुदान.
- तुषार सिंचन : 47 हजार रुपयांपर्यंत अनुदान.
- सौर पंप : 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान.
- इनवेल बोरिंग: 40 हजार रुपयांपर्यंत अनुदान.
- बैलचलित अवजारे: 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान.
- परसबाग : 5000 रुपयांपर्यंत अनुदान.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:Farmer ID, 7/12 उतारा, 8 अ उतारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, जातीचा दाखला (अनुसूचित जमातीसाठी).
अर्ज कसा करावा : या योजनेसाठी MahaDBT पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच, तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयात किंवा पंचायत समितीमध्येही अर्ज करू शकता.
अधिक माहितीसाठी : तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकता.