Join us

MahaDBT Lottery List : महाडीबीटीवर कृषी यांत्रिकीकरण सोडत आली, अशी पहा जिल्हानिहाय यादी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 18:40 IST

MahaDBT Lottery List : महाडीबीटीवरील कृषी यांत्रिकीकरण योजनेची सोडत यादी २५ जुलै २०२५ रोजी काढण्यात आलेली आहे.

MahaDBT Lottery List : महाडीबीटीवरील कृषी यांत्रिकीकरण योजनेची सोडत यादी २५ जुलै २०२५ रोजी काढण्यात आलेली आहे. तर या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे, त्यांनी आवश्यक कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करून घ्यावे. तसेच संबंधित जिल्हानिहाय आपल्याला यादी पाहता येणार आहे. 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (Mechanization Lottery List) द्वारे कृषि विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटकसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात. या ऑनलाइन प्राप्त अर्जामधून महाडीबीटी पोर्टलद्वारे सोडत काढली जाते. 

इथे पहा जिल्हानिहाय यादी 

कृषि यांत्रिकीकरण सोडत यादीमध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कर्टर, इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. महाडीबीटी सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे. त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर 7/12, होल्डिंग, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, आणि टेस्ट रीपोर्ट, तसेच ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्तीचे आरसी बुक अपलोड करावे लागते. 

त्यानंतर पूर्वसंमती आणि पुढे अनुदान रक्कम अदा करणे असे टप्पे महाडीबीटीमध्ये आहेत. ट्रॅक्टर चलित औजारांसाठी निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे. जर ट्रॅक्टर हे निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने नसेल तर कुटुंबातील सदस्यांच्या नावाने असणे आवश्यक आहे. (येथे कुटुंब म्हणजे आई, वडील आणि त्यांचे अविवाहित अपत्य)  

टॅग्स :कृषी योजनाशेतीशेतकरी