Join us

Kanda Lagwad : मार्केटमध्ये आपला कांदा कधी आणायचा यासाठी कसे कराल लागवडीचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 16:24 IST

महाराष्ट्रात कांदा अर्ली-खरीप, खरीप, लेट-खरीप आणि रब्बी या चार हंगामात घेतला जातो.

महाराष्ट्रात कांदा अर्ली-खरीप, खरीप, लेट-खरीप आणि रब्बी या चार हंगामात घेतला जातो. अर्ली-खरीप कांद्याची काढणी ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान केली जाते ज्याची लागवड एप्रिल-मे मध्ये करण्यात येते.

राज्यात खरीप कांद्याची रोपण जुलै-ऑगस्ट दरम्यान होते व काढणी ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान केली जाते. लेट-खरीप कांद्याची काढणी जानेवारी ते मार्च दरम्यान होते ज्याची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान केली जाते.

राज्यातील शेतकरी डिसेंबरमध्ये रब्बी कांद्याची लागवड सुरू करतात व ती जानेवारी अखेर पर्यंत चालते. लावलेल्या रब्बी कांद्याची काढणी मार्चच्या अखेरीस सुरू होते आणि मे अखेरपर्यंत चालू राहते.

राज्यात रब्बी हंगामात एकूण कांद्याच्या सुमारे ५०-६० टक्के उत्पादन होते, त्यानंतर लेट-खरीप कांद्याचे ३०-४० टक्के, खरीप कांद्याचे ८-९ टक्के व अर्ली-खरीप कांद्याचे १-२ टक्के उत्पादन होते.

महाराष्ट्रातील कांद्याची पेरणी, पुनर्लावणी आणि काढणीची वेळ

हंगामपेरणीची वेळपुनर्लावणीची वेळकाढणीची वेळ
अर्ली-खरीपफेब्रुवारी-मार्चएप्रिल-मेऑगस्ट-सप्टेंबर
खरीपमे-जूनजुलै-ऑगस्टऑक्टोबर-डिसेंबर
लेट-खरीपऑगस्ट-सप्टेंबरऑक्टोबर-नोव्हेंबरजानेवारी-मार्च
रब्बीऑक्टोबर-नोव्हेंबरडिसेंबर-जानेवारीएप्रिल-मे

अधिक वाचा: Us Lagwad : पूर्वहंगामी उसाची लागवड करताय उत्पादन वाढीसाठी असे करा नियोजन

टॅग्स :कांदालागवड, मशागतपेरणीशेतीपीकबाजारकाढणी