Join us
Daily Top 2Weekly Top 5

Jamin Mojani : शेतजमीन हद्दीवरून होणारे वाद कमी होणार; आलंय जमीन मोजणीचे नवीन तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:44 IST

शेतजमीन मोजणीत दिवसेंदिवस हायटेक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. परिणामी, मोजणीत अचूकता आणि गतिमानता येत आहे. जिल्ह्यात ५७ रोव्हरद्वारे मोजणीचे काम केले जात आहे.

शेतजमीन मोजणीत दिवसेंदिवस हायटेक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. परिणामी, मोजणीत अचूकता आणि गतिमानता येत आहे. जिल्ह्यात ५७ रोव्हरद्वारे मोजणीचे काम केले जात आहे.

याशिवाय ऑनलाइन अर्ज दाखल करून घेतले जात असल्याने वशिलेबाजी, खाबुगिरीला काही प्रमाणात चाप बसला आहे. केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेंतर्गत शहराप्रमाणे गावांनाही पत्रिका देण्यात येत आहेत. 

ड्रोनद्वारे सर्वेक्षण- ड्रोन सर्वेक्षणामुळे हद्दीवरूनचे वाद टाळता येणार आहेत.- यापूर्वी मनुष्यबळाचा वापर करून जमिनीचे मोजमाप करावे लागायचे.- यात वेळ, पैसाही लागत असे. आता जमिनीचे मोजमाप, सर्वेक्षण ड्रोन सर्वेक्षणच्या माध्यमातून होणार आहे.- या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक गावातील जमिनीचा डिजिटल नकाशा, कुठल्या शेतकऱ्याची किती एकर जमीन आहे?- याचा ड्रोनद्वारे मॅप तयार केला जाणार आहे. परिणामी, एखाद्या शेतकऱ्याकडे किती एकर जमीन आहे, हे स्पष्ट होणार आहे.

मोजणीतील मनुष्यबळही उच्चशिक्षित- भूमी अभिलेखमध्ये सर्वेव्हअर म्हणून बीई शिक्षण घेतलेल्या तरुणांनी नोकरी स्वीकारली आहे.- परिणामी, ते मोजणीसाठीचे आधुनिक यंत्र रोव्हरसह इतर तंत्रज्ञान सहजपणे आत्मसात करीत आहेत.- संगणक हाताळण्यात ते तज्ज्ञ आहेत. याचाही फायदा प्रशासनास होत आहे.

रोव्हरद्वारे मोजणीमुळे अचूकता- रोव्हर तंत्रज्ञानामुळे जमीन मोजणीत अचूकता आली आहे. वेळही वाचत आहे.- मोजणीत गतिमानता आल्याने मोजणीची प्रकरणे मार्गी लावणे सोपे झाले आहे.

ऑनलाइन अर्ज- मोजणीसाठी पूर्वी ऑफलाइन अर्ज दाखल करून घेतले जात होते.- यामध्ये दलाल, साहेबांच्या ओळखीचा किंवा वशिल्याने आलेल्यांचा नंबर प्राधान्याने लागला होता.- ऑनलाइन अर्जामुळे नियमाप्रमाणे मोजणीचा नंबर येतो.

अधिक वाचा: Sathekhat : साठेखत म्हणजे नक्की आहे तरी काय; का केले जाते साठेखत? पाहूया सविस्तर

टॅग्स :सरकारकेंद्र सरकारराज्य सरकारशेतकरीशेतीऑनलाइन