Join us

उन्हाळी मिरची पिकातून मिळवायचा असेल अधिक फायदा तर 'फूलकिडी'ला वेळीच रोखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 18:09 IST

Chilli Crop Management : उन्हाळी मिरचीची लागवड आधुनिक पद्धतीने केल्यास कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळू शकते. मात्र, 'फूलकिडी'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोप लावणीपासूनच घेण्याची गरज आहे.

राम मगदूम

उन्हाळी मिरचीची लागवड आधुनिक पद्धतीने केल्यास कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळू शकते. मात्र, 'फूलकिडी'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोप लावणीपासूनच काळजी घेण्याची गरज आहे.

यासाठी मल्चिंग अंथरण्यापूर्वी डीएपी, गंधक, मायक्रो न्यूट्रीएंट, सेंद्रिय-जिवाणू खते, निंबोळी-करंजी पेंड, आदी खतांचे बेसल डोस मातीत मिसळावे.

तसेच २-३ दिवस बेड भिजवून मल्चिंगवर होल पाडून एकरी ७ ते ८ हजार रोपे लावावीत. त्यानंतर तीन दिवसांच्या अंतराने तीन वेळा ह्युमिक ॲसिड, बुरशीनाशक व किटकनाशक यांचे मिश्रण करून आळवणी करावी.

उन्हाळी मिरचीवर करपा, डाऊणी, फळकूज व मररोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो त्यामुळे पिकावर वेळोवेळी लक्ष ठेवून अचूक निरीक्षण करत आलेल्या किडींचे नियंत्रण करावे.

एकरी चार ते पाच लाख....

रोप लावणीच्या ८० दिवसानंतर उत्पादन सुरू होते. एकरी २५ ते ३० टन उत्पादन होऊ शकते. प्रतिकिलो ३० ते ३५ रुपये दर मिळाल्यास कमी कालावधीत एकरी सुमारे ४ ते ५ लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकते.

फूलकिडी रोखण्यासाठी काय कराल ?

● मल्चिंगचे अच्छादन करण्यापूर्वी बेसलन डोसबरोबर एकरी ८ किलो क्लोऐन्ट्रानिलीप्रोल ०.४ टक्के जीआर, १० किलो फिप्रोनिल माती मिसळावे.

● रोप लागणीनंतर १० ते १५ दिवसांनी थायमोक्सम (३० टक्के एफएस), १०० ते १५० मि.ली. प्रतीएकर आळवणी करावी. लागणीनंतर ८ ते १० दिवसांनी ॲक्ट्रा व निमऑइल पाण्यातून फवारावे.

● १२ ग्रॅम पेगासीस व २५ मि.ली. रोगर १५ लिटर पाण्यातून फवारावे. २१ व ३० व्या दिवशी बेनीव्हिया (३६० मिली) दोनवेळा एकरी फवारावे.

● कॉन्फीडॉर सुपर, डेलीगेट, ५० पीपीएफ नीमऑइल, ओमाइट, अलिका, सुटाथियॉन ही किटकनाशके गरजेनुसार व टप्प्याटप्प्याने फवारावीत.

● पिवले, निले, चिकट सापळे आणि फळमाशी/कामगंध सापळे लावावेत. तसेच प्लॉटच्या चारही बाजूला इन्साइड नेट बांधावे.

पांढरी माशी, मावा, फुलकिडे, तुडतुडे या रस शोषणाऱ्या किड्यांमुळे चुरडा-मुरडा रोगाचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात ७० टक्के घट येते. त्यामुळे आधुनिक पद्धतीने उन्हाळी मिरची घेतल्यास अपेक्षित उत्पन्न नक्कीच मिळते. - हरिदास बोंगे, तालुका कृषी अधिकारी, गडहिंग्लज.

हेही वाचा : एका वर्षात मोती निर्माण करण्यात संशोधकांना यश; राज्याच्या 'या' विद्यापीठात यशस्वी मोती शेती

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीपीक व्यवस्थापनकीड व रोग नियंत्रणमिरची