अलीकडे वाढते शहरीकरण व औद्योगिकरणामुळे शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. अशा परिस्थितीत पिकाचे कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवणे गरजेचे आहे. मातीचा उपयोग न करता झाडांना आवश्यक असलेले पोषक द्रव्य पाण्याच्या साह्याने दिली जातात यालाच हायड्रोपोनिक्स असे म्हणतात.
हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे अशी शेती जिला मातीची गरज नसते वनस्पतीला व पिकाला आवश्यक खनिजे आणि खते पाण्याद्वारे दिली जातात. हायड्रोफोन शेतीत पीक उत्पादनासाठी फक्त तीन गोष्टी आवश्यक असतात पाणी, पोषक आणि प्रकाश जर आपण मातीशिवाय या तीन गोष्टी दिल्या तर झाडे फुलू शकतात, अशा तंत्रनास हायड्रोपोनिक्स तंत्र असे म्हणतात.
हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे घेतली जाणारी पिके यामध्ये जागेचा कमीत कमी वापर करणाऱ्या पिकांची लागवड केली जाते. जसे की गाजर, मुळा, शिमला मिरची, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, अननस, टोमॅटो, भेंडी, पालक, काकडी, औषधी वनस्पती चांगल्या प्रकारे वाढवता येतात.
हायड्रोपोनिक्स चे प्रकार
ॲक्टिव प्रकार : यामध्ये पाण्याच्या साह्याने पीक घेतले जाते. पाण्याचा वापर पुन्हा पुन्हा केला जातो. ॲक्टिव्ह पद्धतीमध्ये जास्त काळजी घ्यावी लागत नाही पाण्याच्या एकसमान वितरित करण्यासाठी पंपाचा वापर केला जातो. या प्रणालीमुळे जलद वाह आणि उच्च उत्पन्नाचा फायदा मिळतो.
पॅसिव्ह प्रकार : या पद्धतीत हायड्रोफोनिक व कोकोपीट चा वापर करून पिके घेतली जातात. कोकोपीट हे नारळाच्या केसरा पासून बनवतात दोन्ही पद्धतीमध्ये झाडाला आवश्यक घटक पुरवले जातात.
हायड्रोपोनिक्स शेतीची सुरुवात कशी करावी
• पहिले हायड्रोपोनिक्स फार्म तयार करा. हायड्रोपोनिक्स शेतीसाठी सेटअप जरी महाग असेल तरी हे जास्त जागा घेत नाही. पीव्हीसी पाईप आणि पाण्याच्या पंपाच्या मदतीने तुम्ही हायड्रोपोनिक्स फार्म तयार करू शकता. हे स्ट्रक्चर तुम्ही घरच्या घरी ही बनवू शकतात किंवा मार्केट मधूनही खरेदी करू शकतात. तुम्ही गोल पाईप किंवा सपाट आकाराचे पाईप देखील वापरू शकतात.
• पाइपची कनेक्शन योग्यरित्या करणे आवश्यक आहे कारण या पाईप मध्ये सतत पाणी वाहते या पाईप मध्ये गोलाकार छिद्रे असतात त्यामध्ये झाडे उगवली जातात.
• पाईप भरण्यासाठी साहित्य गोळा करा साहित्य म्हणजे आपण नारळाचा भुसा वापरू शकता, जेणेकरून पाईप मध्ये ओलावा टिकून राहील
वनस्पतीना लागणारे पोषक तत्वे
• हायड्रोपोनिक्स शेतीमध्ये सर्वात महत्त्वाचा हा भाग आपल्याला कोणते पीक घ्यायची आहे यानुसार पोषक द्रव्य निर्भर आहे. जेव्हा पीक मातीमध्ये वाढते तेव्हा त्याला सर्व पोषक तत्वे ही जमिनीतून मिळतात. हायड्रोपोनिक्स शेतीमध्ये पाईप द्वारे झाडांना पाणी दिले जाते या पाण्यात ते पोषक घटक मिसळले असतात.
हायड्रोपोनिक्ससाठी पाण्याची व्यवस्था
• हायड्रोपोनिक्स शेती ही पाण्यावर अवलंबून असते तरीही काम अगदी कमी पाण्यात पूर्ण होते. हायड्रोपोनिक पद्धतीने पाणी देण्याचा नियम असा आहे की झाडाचे मूळ नेहमी ओले असले पाहिजे. इथे पाण्यामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे पाण्याची पीएच व्हॅल्यू संकुलित ठेवावी लागते. पीएच मेंटेन ठेवण्यासाठी त्यात वेगवेगळी रसायने मिसळली जातात.
• दुसरी गोष्ट अशी की पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण पुरेशी असावे. वनस्पतीची मुळे कधी कधी जमिनीवर खोदली जातात त्यामुळे त्यांना ऑक्सिजन मिळू शकतो परंतु हायड्रोपोनिक्स मध्ये झाडांची मुळे ही पाण्यामध्येच असतात.
हायड्रोपोनिक्स शेतीचे फायदे
• कमी जागेत जास्त उत्पादन करू शकतो. • ९० टक्के पाण्याची बचत होते. जागेचा सर्वाधिक वापर करता येतो. वर्षभर उत्पादन घेता येते. • कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. • मशागत, आंतरमशागत, खुरपणी अशी कामे करावी लागत नाही. • मातीमधून ज्या रोगांचा प्रादुर्भाव होतो तो टळतो. • ट्रान्सपोर्टेशन चा खर्च होत नाही.
लेखक प्रा. अभिषेक पी. धुमाळआदित्य कॉलेज ऑफ अॅग्री, बायोटेक्नॉलॉजी, बीड.
हेही वाचा : Success Story : शेतीपूरक जोडधंदाची धरली वाट; भारत पाटलांची संकटांवर मात