Join us

कापूस पिकातील गळफांदी आणि फळफांदी कशी ओळखायची? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:05 IST

गळफांदी कापायच्या अगोदर तुम्हाला फळफांदी व गळफांदी नेमकी कोणती आहे हे माहिती करून घेणे गरजेचे आहे.

कपाशीतील फळ फांदी (Reproductive branch) ही ती फांदी असते जिला कपाशीची बोंडे लागतात, तर गळ फांदी (Vegetative branch) ही अशी फांदी असते जी मुख्य रोपाची वाढ करते पण तिला बोंडे लागत नाहीत, म्हणजेच ती फक्त शाखीय वाढ करते. 

कपाशी पिकात गळफांदी आणि फळफांदी कशी ओळखायची?

  1. गळफांदी कापायच्या अगोदर तुम्हाला फळफांदी व गळफांदी नेमकी कोणती आहे हे माहिती करून घेणे गरजेचे आहे.
  2. साधारणपणे एका झाडावर तीन किंवा चार गळफांद्या असतात व ही फांदी खोडाच्या अगदी सुरुवातीला लागून किंवा खोडाला समांतर वाढते.
  3. त्या उलट फळफांद्या या जमिनीला समांतर वाढतात. साधारणपणे गळफांदी ही लागवड केल्यानंतर ४० दिवसांनी ओळखता येते.
  4. कालावधीत या फांद्यांवर पाने व शेंडांवर काही प्रमाणामध्ये पाते लागल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे हे फांदी अचूकपणे ओळखून खोडापासून एक इंच अंतरावर धारदार कटरच्या साह्याने कापावी.
  5. तसेच गळफांदी कापताना खोडाची साल निघू नये किंवा झाडाला इजा होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी.
  6. तसेच शेंडा खुडताना झाडाची उंची तीन फूट झालेली आहे याची खात्री करावी व त्यानंतरच सहा इंच लांबीचा शेंडा कटरच्या साह्याने कापावा.

अधिक वाचा: शेतजमीन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी सातबाऱ्यावरील 'ह्या' गोष्टी पाहणे महत्वाचे

टॅग्स :कापूसपीक व्यवस्थापनशेतीशेतकरीपीक