नारळ पिकातील किडींमध्ये गेंड्या भुंगा, काळ्या डोक्याची अळी व इरीओफाईड कोळी ह्या प्रमुख किडी आहेत. यात गेंड्या भुंग्यामुळे नारळात मोठे नुकसान होते. नियंत्रणासाठी कशा उपाययोजना करायच्या त्या पाहूयात.
१) नारळावरील गेंड्या भुंगा rhinoceros beetle in coconut▪️हा भुंगा काळ्या रंगाचा असून त्याच्या डोक्यावर गेंड्यासारखे शिंग असते म्हणून याला गेंड्या भुंगा असे म्हणतात.▪️हा भुंगा माडाच्या शेंड्यामध्ये नवीन येणारा कोंब खातो.▪️ज्या झाडांना भुंगा लागला आहे. त्यांच्या शेंड्याजवळ ताजी भोके पडलेली दिसतात व नवीन येणारी पाने त्रिकोणी आकारात कापलेली आढळतात. ▪️तसेच हा भुंगा नवीन येणाऱ्या कोंबाचेही नुकसान करतो. छोट्या माडांना प्रादुर्भाव झाल्यास माड मरू शकतो.▪️भुंग्याने पाडलेल्या भोकातून भुंग्याची मादी अंडी घालते त्यामुळे अशा माडांच्या भोकात पाणी साचून बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.उपाय१) नारळावरील गेंड्या भुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त माड साफ करून सर्वात वरील पानांच्या बेचक्यात २ टक्के मिथील पॅराथिऑन पावडर ५० ग्रॅम, ५० ग्रॅम वाळू यांचे समप्रमाणात मिश्रण करून भरावे.२) बागेमध्ये शेणखताच्या खड्डयात अळ्यांना मारण्यासाठी ५० टक्के कार्बारिल भुकटी ४० ग्रॅम प्रति १० लि. पाण्यात मिसळून फवारावी.
२) नारळावरील इरीओफाईड कोळी eriophyid mites in coconut▪️ही कोड तिच्या टोकदार सुईसारख्या तोंडामुळे नारळ फळातील रस शोधून घेते.▪️परिणामी देठाच्या खालच्या भागात पांढरे चट्टे वाढत जाऊन तसतसे अशा फळावर तपकिरी रंगाच्या उभ्या रेषा उमटू लागतात.▪️या रेषा वाढत जाऊन हळूहळू फळाच्या बाहेरील आवरण तडकते. त्यामुळे फळाची वाढ व्यवस्थित होत नाही.▪️पर्यायाने नारळ लहान राहून उत्पादन कमी होते.▪️लहान फळांची मोठ्या प्रमाणात गळ होते.
उपाय१) वाढलेल्या तापमानामुळे इरीओफाईड कोळीचा प्रादुर्भावाची शक्यता आहे.२) असे झाल्यास नारळाच्या आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाच्या शेंड्या पुराव्यात आणि झावळ्यांचे आच्छादन करावे.३) पाच टक्के कडूनिंबयुक्त (अॅझाडीराक्टीन) कीटकनाशक ७.५ मि.ली. + ७.५ मि.ली. पाणी किंवा फेनपायरेक्झीमेट ५ टक्के प्रवाही १० मि.ली. + २० मि.ली. पाण्यात मिसळून मुळाद्वारे द्यावे.४) औषध दिल्यानंतर ४५ दिवसापर्यंत नारळ काढू नयेत.५) याशिवाय बुटक्या माडावर १ टक्का कडुनिंबयुक्त कीटकनाशक (निमाझोल) ४ मि.ली. प्रती लिटर पाण्यातून किंवा फेनपायरेक्झीमेट ५ टक्के प्रवाही २ मि.ली प्रती लिटर पाण्यातून नारळाच्या घडावर पडेल अशी फवारणी करावी.६) फवारणी करण्यापूर्वी सर्व किडग्रस्त व तयार नारळ काढून घ्यावेत.७) नारळ बागेमधील किडीच्या नियंत्रणासाठी मृत माडाची खोडे काढून नष्ट करावीत.८) पालापाचोळा गोळा करून बागेत स्वच्छता राखावी.
अधिक वाचा: Amba Mohor Sanrakshan : आंबा पिकातील रसशोषक किडी व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी कशा घ्याल फवारण्या?