Lokmat Agro >स्मार्ट शेती > Gardening Tips: घराच्या बागेत ड्रॅगन फ्रुट पिकविण्याच्या १० टिप्स, जाणून घ्या

Gardening Tips: घराच्या बागेत ड्रॅगन फ्रुट पिकविण्याच्या १० टिप्स, जाणून घ्या

Gardening Tips: Step-by-Step Guide to Growing Dragon Fruit in Your Home Garden | Gardening Tips: घराच्या बागेत ड्रॅगन फ्रुट पिकविण्याच्या १० टिप्स, जाणून घ्या

Gardening Tips: घराच्या बागेत ड्रॅगन फ्रुट पिकविण्याच्या १० टिप्स, जाणून घ्या

Dragon Fruit Gardening: Essential Tips for Home Cultivation: घरच्या बागेत ड्रॅगन फळ कसे पिकवावे? या आहेत काही टीप्स आणि ट्रिक्स.

Dragon Fruit Gardening: Essential Tips for Home Cultivation: घरच्या बागेत ड्रॅगन फळ कसे पिकवावे? या आहेत काही टीप्स आणि ट्रिक्स.

शेअर :

Join us
Join usNext

Essential Tips for Home Cultivation of dragon fruit, ड्रॅगन फळ, (Dragon Fruit) ज्याला पिताया असेही म्हणतात, हे एक आकर्षक आणि पौष्टिक फळ आहे. ते बाजारात बरेच महाग मिळते. हे फळ आतून लाल गर्द किंवा सफेद रंगाचे असते.तर बिया या बारिक व काळ्या रंगाच्या असतात. घराच्या बागेत ड्रॅगन फळ वाढवणे खूपच सोपे आहे. आणि त्याला येणारी फळे ही समाधान देतात. शिवाय विनासायास आपण थोडक्यात कमी देखभालीत चांगले उत्पादन घेता येते. चला, घरच्या बागेत ड्रॅगन फळ कसे वाढवायचे ते जाणून घेऊ या.

१. योग्य ठिकाणाची निवड:
ड्रॅगन फळाची झाडे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय हवामानात उत्तम प्रकारे वाढतात. थोडक्यात यास उन्हा सोबत तापमानाची अधिक गरज असते. त्यामुळे तुमच्या बागेत अशी जागा निवडा जी पुरेशा सूर्यप्रकाशाने परिपूर्ण असेल. ड्रॅगन फळाची झाडे दिवसातून किमान ६-८ तास सूर्यप्रकाश मिळवण्याची आवश्यकता असते. शिवाय हे काटेरी पर्णदार वनस्पती असल्यामुळे त्यास पाण्याची गरज ही कमी प्रमाणात असते. त्यामुळे हे सहज रित्या गच्चीवर, टेरेसवर मध्यम व मोठ्या आकाराच्या ड्रम व एरोब्रिक्स टॅंक मधे येतात.

२. जमिनीची तयारी:
ड्रॅगन फळाच्या झाडांसाठी चांगल्या ड्रेनेज असलेली थोडक्यात पाण्याचा निचरा होईल अशी मातीची गरज असते. खडकाळ, मुरमाड मातीतही ड्रॅगन फ्रुट चांगल्या रितीने बहरतात. आणि सेंद्रिय पदार्थांनी ( पालापाचोळा, किचन वेस्ट) समृद्ध असलेली जमीन आवश्यक आहे. लागवडीपूर्वी जमिनीत कंपोस्ट मिसळा आणि त्याला सेंद्रिय खतात शेणखत हे उत्तम असते.

३. लागवड:
ड्रॅगन फळाच्या लागवडीसाठी पानांचे कटिंग किंवा रोपे वापरता येतात. कटिंगसाठी, सुमारे १२-१५ इंच लांबीचे पानांची निवड करा. आणि त्यांना छायेत दोन-तीन दिवस ठेवून त्यास प्लॅस्टिकच्या छोट्या पिशव्यात रूजवा. त्यास महिनाभरात मुळ फूट लागतात. शिवाय पानांनी जिव धरल्यास त्यास मोठ्या ड्रम अथवा जमिनीत लागवड करावी.. कटिंग्सला २-३ इंच खोल मातीत लावा आणि त्यांना चांगले पाणी द्या.

४. पाणी व्यवस्थापन:
ड्रॅगन फळाच्या झाडांना नियमित पाणी देणे आवश्यक आहे, परंतु मुळांजवल पाणी साठणार नाही याची काळजी घ्या. उन्हाळ्यात दररोज पाणी द्या आणि हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण कमी करा. जमिनीतील ओलावा तपासा आणि त्यानुसार पाणी द्या. खूप पाणी देण्याने मुळ कुज होण्याची शक्यता असते. त्यातून पाणे वरवर वाळू लागतात.

५. सपोर्ट अथवा आधार :
ड्रॅगन फळाच्या झाडांना आधाराची आवश्यकता असते. कारण पानं ही स्वतःचा भार सहन करू शकत नाही. तसेच येणारी फळे ही खूप वजनदार व संख्येने जास्त असतात. त्यामुळे त्यांंना आधाराची गरज असते. आधारासाठी मजबूत खांब किंवा गोलाकार सिमेंटची रिंग वापरावी. ज्यावर झाडे वाढू शकतात. झाडे वाढत असताना त्यांना योग्य दिशा द्या आणि आवश्यकतेनुसार वेळोवेळी बांधणी करा.

६. खत व्यवस्थापन:
ड्रॅगन फळाच्या झाडांना नियमित सेंद्रिय खतांची ( चांगले कंपोस्ट झालेले शेणखत, कंपोस्ट खत, लेंडीखत) आवश्यकता असते. वाढीच्या काळात दर २-३ महिन्यांनी सेंद्रिय कंपोस्ट किंवा व्हर्मी कंपोस्ट द्या. तसेच, द्राव्य खतात घरी बनवलेलेल ह्यूमिक जल व जिवामृत द्या. फळांची व झाडांची वाढ जोमाने होते.

७. रोग आणि कीटक नियंत्रण:
ड्रॅगन फळाच्या झाडांवर कीटक आणि रोगांचा प्रभाव कमी असतो किंबहुना नसतोच. तरही नियमित निरीक्षण करा. पानांच्या दाटी मुळे त्यात किड निवासाला येतात. व त्यांचा प्रादुर्भाव वाढवतात. आणि कोणत्याही कीटकांच्या किंवा रोगांच्या लक्षणांची तपासणी करा. नैसर्गिक कीटकनाशके ( निम अर्क, जिवामृताची फवारणी ) किंवा जैविक उपाय वापरून कीटक नियंत्रण करा. ( पिवळे चिकट सापळे)

८. फळांची काढणी:
ड्रॅगन फळे साधारणतः लागवडीनंतर ६-८ महिन्यांत तयार होतात. फळांची रंग बदलून ती बाहेरून गडद लाल किंवा गुलाबी होतात तेव्हा ती काढणीसाठी तयार असतात. फळे कोमल आणि थोडीशी मऊ झाल्यावर ती काढा. म्हणजे त्यांची चव आंबट गोड लागते. योग्य पोषण मिळाल्यास एक एक फळ हे १ ते दीड किलोचे भरते व कमीत कमी पावशेर ( २५० ग्रॅम) तरी असते.

९) आरोग्यदायी फायदाः
या फळांना बाजारात प्रचंड मागणी असते. आजारपणात अशक्तपणाआल्यास या फळांचे सेवन करा असे डॉक्टर नेहमीच सुचवतात. शिवाय रक्तातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यावर सुध्दा यांचे सेवन करणे लाभदायक ठरते.

घराच्या बागेत ड्रॅगन फळाची लागवड करणे ही एक आनंददायी प्रक्रिया आहे. योग्य काळजी आणि व्यवस्थापनाने तुम्ही तुमच्या बागेत स्वादिष्ट आणि पौष्टिक ड्रॅगन फळे उगवू शकता. या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि तुमच्या बागेत ड्रॅगन फळांच्या सुगंधाचा आनंद घेऊ शकाल. 

-संदीप चव्हाण,
गच्चीवरची बाग, नाशिक
संपर्क क्रमांक: +91 80874 75242

Web Title: Gardening Tips: Step-by-Step Guide to Growing Dragon Fruit in Your Home Garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.