Join us

ड्रॅगन फ्रूट बागेत दुहेरी उत्पादनाचे 'हे' उपाय करा अन् 'सनबर्न' पासून देखील मोफत सुटका मिळवा

By रविंद्र जाधव | Updated: February 16, 2025 16:09 IST

Dragon Fruit Crop Management In Summer : उष्ण कटिबंध पीक म्हणून ड्रगण फ्रूट कडे सहसा बघितले जाते. मात्र असे असूनही उन्हाळ्यात ड्रॅगन फ्रूटला बागेत 'सनबर्न' चा मोठा प्रादुर्भाव दिसून येतो. जेव्हा ड्रॅगन फ्रूट फळावर जास्त सूर्यप्रकाश किंवा अधिक उष्णतेचा तासंतास तडाखा होतो तेव्हा 'सनबर्न'चा प्रादुर्भाव होतो. 

उष्ण कटिबंध पीक म्हणून ड्रगण फ्रूट कडे सहसा बघितले जाते. मात्र असे असूनही उन्हाळ्यात ड्रॅगन फ्रूटला बागेत 'सनबर्न' चा मोठा प्रादुर्भाव दिसून येतो. जेव्हा ड्रॅगन फ्रूट फळावर जास्त सूर्यप्रकाश किंवा अधिक उष्णतेचा तासंतास तडाखा होतो तेव्हा 'सनबर्न'चा प्रादुर्भाव होतो. 

ज्यात झाडाच्या फांद्यावर गडद लाल-पिवळे चट्टे पडतात. अनेकदा पूर्ण फांदी खराब होते, परिणामी फूल आणि फळ धारणा कमी होऊन येणाऱ्या हंगामात उत्पादन मंदावते. यावर उत्पादक शेतकरी यांच्याशी केलेल्या चर्चेअंती ड्रॅगन फ्रूटला सनबर्नपासून संरक्षणासाठी काही सोपे उपाय पुढीलप्रमाणे. 

ड्रॅगन फ्रूटवरील सनबर्नची लक्षणे

रंग बदलणे - अधिक सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळे पानांचा रंग बदलतो. 

डाग (चट्टे) -  'सनबर्न' प्रभावित भागात गडद लाल-पिवळे चट्टे दिसून येतात. ज्यांची अधिक गतीने वाढ होते. 

ड्रॅगन फ्रूटच्या सनबर्नपासून संरक्षणासाठी उपाय

सावलीचे कापड - झाडांना थेट सूर्यापासून संरक्षण देण्यासाठी सावली निर्माण होईल अशा कापडाचे (शेडनेट कापड) झाडावर लावणे.

आंतरपीक - बागेत आंतर पीक म्हणून बाजरी, ज्वारी, दोन-तीन कापणीचा चारा आदींचे पीक घेतल्यास थंडावा निर्माण होऊन सनबर्नचा धोका कमी करता येतो. 

वनशेती - बागेत साग, महोगुणी, निलगिरी आदींची लागवड केल्यास झाडांची योग्य वाढ झाल्यावर वनशेतीचा एक रक्कमी आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच या झाडांमुळे नैसर्गिक सावली निर्माण होऊन सनबर्न टाळता येऊ शकतो

या सोप्या उपायांनी तुम्ही ड्रॅगन फ्रूटच्या झाडांवर सूर्याचा तडाखा टाळू शकता आणि चांगली फळे मिळवू शकता.

हेही वाचा : बाजारात वर्षभर मागणी असलेल्या 'या' उत्पादनाची करा निर्मिती; बाजरीचे मूल्यवर्धन होऊन उपलब्ध होतील रोजगार संधी

टॅग्स :पीक व्यवस्थापनशेतकरीशेतीशेती क्षेत्रफलोत्पादनकीड व रोग नियंत्रण