परदेशी भाजीपाला म्हणजे काय? तर मूळ बाहेरील देशांतून आलेल्या व आधुनिक शेतीत लागवड केल्या जाणाऱ्या भाजीपाला पिकांना परदेशी भाजीपाला असे म्हणतात. या भाज्यांचा उगम युरोप, अमेरिका, चीन, जपान इत्यादी देशांमध्ये झाला आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट, सुपर मार्केट व निर्यात बाजारात या भाजीपाला पिकांना सध्या जास्त मागणी आहे. पोषणमूल्ये, चव व आकर्षक दिसणे ही या भाजीपाला पिकांची वैशिष्ट्ये आहेत. ज्यामुळे बाजार दर देखील तेजीत दिसून येतात.
बहुतेक परदेशी भाजीपाल्याचे उत्पादन प्रामुख्याने पॉलीहाऊस, शेडनेट किंवा नियंत्रित वातावरणात घेतले जाते. योग्य व्यवस्थापन केल्यास या पिकांतून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकते.
परदेशी भाजीपाल्याची ही आहेत नावे
ब्रोकली, लेट्यूस, झुकीनी, सेलेरी, पार्सले, चेरी टोमॅटो, बेल पेपर (रंगीत ढोबळी मिरची), बसेल्स स्प्राऊट, आइसबर्ग लेट्यूस इत्यादी.
परदेशी भाजीपाला शेती कशामुळे फायदेशीर ?
• उच्च बाजारभाव व मागणी : ब्रोकली, लेट्यूस, झुकिनी, रंगीत ढोबळी मिरची यांसारख्या परदेशी भाज्यांना हॉटेल, मॉल व निर्यात बाजारात चांगला दर मिळतो.
• कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न : संरक्षित शेती व मातीविना शेती तंत्रज्ञानामुळे कमी जागेत जास्त उत्पादन घेता येते.
• संपूर्ण वर्षभर उत्पादनाची संधी : पॉलीहाऊस/नेटहाऊसमुळे हंगामावर अवलंबून न राहता वर्षभर पीक घेता येते.
• थेट विक्री व करार शेतीची शक्यता : सुपरमार्केट, रेस्टॉरंट व निर्यातदारांशी थेट करार केल्याने मध्यस्थांचा खर्च कमी होतो.
या शेतीतून किती मिळणार उत्पन्न ?
• ओपन फिल्ड लागवड (एक एकर) : परदेशी भाज्यांपासून अंदाजे २ ते ३ लाख/एकर/हंगाम उत्पन्न मिळू शकते.
• नेटहाऊस/शेडनेट शेती (एक एकर) : नियंत्रित वातावरणामुळे उत्पन्नात वाढ होतो परिणामी ४ ते ५ लाख/एकर/हंगाम उत्पन्नाची शक्यता.
• पॉलीहाऊस शेती (एक एकर) : उच्च दर्जा व वर्षभर उत्पादनामुळे ७ ते ८ लाख/एकर/वर्ष उत्पन्न मिळू शकते.
• हायड्रोपोनिक्स/मातीविना शेती (एक एकर) : लेट्यूस, सेलेरी, मायक्रोग्रीन्ससाठी १० ते १२ लाख/एकर/वर्ष पर्यंत उत्पन्न शक्य.
• थेट विक्री व करार शेती असल्यास : हॉटेल, मॉल, निर्यातदार यांना थेट विक्रीमुळे उत्पन्नात २०-३०% वाढ होऊ शकते.
(आकडेवारी सरासरी करून घेतलेली असून पीक निवड, व्यवस्थापन, बाजारभाव व तंत्रज्ञानवर अवलंबून प्रत्यक्ष उत्पन्न कमी-जास्त होऊ शकते.)
या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रामुख्याने वापर
• संरक्षित शेती तंत्रज्ञान : पॉलीहाऊस, नेटहाऊस, शेडनेट यामध्ये तापमान, आर्द्रता व प्रकाश नियंत्रित करून उच्च दर्जाचे उत्पादन घेतले जाते.
• मातीविना शेती : कोकोपीट, परलाइट किंवा न्यूट्रिएंट सोल्युशन वापरून लेट्यूस, ब्रोकली, सेलेरी, झुकिनी यांसारख्या परदेशी भाज्यांचे उत्पादन.
• ड्रिप सिंचन व फर्टिगेशन प्रणाली : पाणी व पाण्यात विरघळणारी खते थेट मुळांजवळ देऊन खतांची बचत व उत्पादन वाढ.
• उच्च प्रतीचे संकरित /आयात बियाणे : रोगप्रतिकारक, जास्त उत्पादन देणाऱ्या आणि निर्यातक्षम गुणवत्तेच्या जातींचा वापर.
• एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन : जैविक कीटकनाशके, स्टिकी ट्रॅप, फेरोमोन ट्रॅप व मर्यादित रासायनिक फवारणीचा समतोल वापर.
• काढणीनंतरचे व्यवस्थापन व कोल्ड चेन तंत्रज्ञान : काढणीनंतर ग्रेडिंग, पेंकिंग, प्री-कूलिंग व थंड साठवणूक करून दर्जा व बाजारभाव टिकवणे.
यशवंत जगदाळेविषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
Web Summary : Foreign vegetable farming, including broccoli and lettuce, offers high profits due to demand in hotels and supermarkets. Polyhouses and soilless techniques allow year-round production. Open field farming yields ₹2-3 lakh/acre/season, while hydroponics can reach ₹10-12 lakh/acre/year.
Web Summary : विदेशी सब्जियों की खेती, जैसे ब्रोकली और लेट्यूस, होटल और सुपरमार्केट में मांग के कारण उच्च लाभ प्रदान करती है। पॉलीहाउस और बिना मिट्टी की तकनीकें साल भर उत्पादन करने में मदद करती हैं। खुले खेत में खेती से ₹2-3 लाख/एकड़/सीजन, जबकि हाइड्रोपोनिक्स से ₹10-12 लाख/एकड़/वर्ष तक आय हो सकती है।