Join us

उसाचा आतील गाभा लाल झालेला दिसतोय? मग उसात आलाय 'हा' रोग; कसे कराल नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 16:49 IST

Red Rot in Sugaracne पावसाळ्यानंतर जेव्हा उसाची वाढ थांबून साखर तयार होण्याचे प्रक्रियेस सुरुवात होते तेव्हा या रोगाची लक्षणे दिसून येतात.

उसातील गाभा रंगणे हा रोग कोलिटोट्रायकम फालकॅटम या बुरशीचे प्रादुर्भावामुळे होतो. सुरुवातीच्या अवस्थेत हा रोग ओळखता येत नाही.

परंतु पावसाळ्यानंतर जेव्हा उसाची वाढ थांबून साखर तयार होण्याचे प्रक्रियेस सुरुवात होते तेव्हा या रोगाची लक्षणे दिसून येतात.

रोगाची लक्षणे◼️ रोगग्रस्त उसाचे शेंड्यापासून तिसरे किंवा चौथे पान निस्तेज पडून वाळते व नंतर पूर्ण शेंडा वाळतो.◼️ रोगग्रस्त ऊस उभा कापला असता आतील गाभा लाल झालेला आढळून येतो.◼️ त्यात अधून-मधून आडवे पांढरे पट्टे दिसतात.◼️ कालांतराने ऊस पोकळ होतो, आकसतो व सालीवर सुरकुत्या पडतात.◼️ अशा उसाला अल्कोहोलसारखा वास येतो.रोगाचा प्रसारया रोगाचा प्रसार बेण्याद्वारे होतो.

नियंत्रणाचे उपाय◼️ लागवडीसाठी निरोगी बेण्याचा वापर करावा.◼️ उष्णजल किंवा बाष्पयुक्त हवा प्रक्रिया देऊन तयार केलेल्या बेणे मळ्यातील बेणे नवीन लागवडीसाठी वापरावे.◼️ लागवडीपूर्वी उसाचे बेणे कार्बेन्डिझम १०० ग्रॅम बुरशीनाशक १०० लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणात १० ते १५ मिनिटे बुडवून लागवड करावी.◼️ ऊस कापण्याचा कोयतासुद्धा निर्जंतूक करून घ्यावा. ◼️ रोगग्रस्त शेतातील उसाची कापणी शक्य तेवढ्या लवकर करवी. रोगग्रस्त उसाचा खोडवा घेऊ नये.◼️ ऊस कापणीनंतर त्या शेतात नवीन ऊस लागवड करू नये. पिकाची फेरपालट करवी.◼️ कापणीनंतर शेतातील पाचाट, वाळा, धसकटे इत्यादी जागेवरच जाळून नष्ट करवीत.◼️ उसाला पाणी कमी द्यावे. ◼️ ज्या भागात रोगाचा प्रादूर्भाव झालेला असेल, तेथे ३ ते ४ वर्षे उसाचे पीक घेऊ नये.◼️ पिकांची फेरपालट करावी.◼️ रोगप्रतिकारक जातीची लागवड करावी. उदा. को-७३१४, को-५७६७.

अधिक वाचा: ऊस पिकात खोड कीड आली 'हे' कसे ओळखावे? कसा करावा बंदोबस्त? वाचा सविस्तर

टॅग्स :ऊसशेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापनकीड व रोग नियंत्रणलागवड, मशागतकाढणी