सततचा पाऊस व अतिवृष्टीनंतर जर शेतातून पाण्याचा योग्य निचरा लवकर झाला नाही तर कापूस पिकावर अनिष्ट परिणाम होतो.
कापसाच्या वाढीसाठी पुरेशा ओलाव्याची गरज असली तरी, जास्त पावसामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे कापूस पिकाची वाढ व उत्पादनावर परिणाम होतो.
रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यताअतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण होणारी जास्त आर्द्रता बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांच्या प्रसारासाठी योग्य वातावरण निर्माण करते. दीर्घकाळ ओल्या परिस्थितीत कापूस पिकावर सामान्यतः आढळणाऱ्या खालील रोगांचा समावेश होतो
१) पानावरील करपाहा जीवाणूजन्य रोग पिकाच्या कोणत्याही अवस्थेत येऊ शकतो. याची सुरुवात पानांवर प्रथम लालसर आणि नंतर काळे ठिपके पडण्याने होते, ज्यामुळे पाने सुकतात आणि गळून पडतात.
२) मर रोग (Wilt)बुरशीमुळे होणारा मर रोग कापसासाठी अत्यंत विनाशकारी आहे. हा रोग झाडाच्या मुळांवर परिणाम करतो. यात मुळांच्या रसवाहिनीमध्ये रोगकारक बुरशीची वाढ होते. बुरशीची वाढ झाल्यामुळे मुळे पाणी आणि पोषक तत्वे शोषून घेऊ शकत नाहीत, परिणामी झाडाचा मृत्यू होतो. अशाप्रकारे प्रादुर्भाव करणारी बुरशीचा प्रसार मातीद्वारे होत असल्यामुळे विशिष्ट भागामध्ये लक्षणे प्रथम दिसतात व त्यापासून पुढे त्याचा प्रसार वेगाने होतो.
३) बोंड सडणेबुरशी आणि जिवाणूंच्या संक्रमणामुळे हा रोग होतो. रोगकारक जीवाणू व बुरशी खराब झालेल्या बोंडांमधून आत प्रवेश करतात. संक्रमित बोंडे कुजतात, त्यांची वाढ थांबते आणि धागे तसेच बियांची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घटते.
४) दहियाओलसर व दमट हवामान आणि अधून मधून पडणारा पाऊस असल्यास पानावर दही शिंपडल्यासारखे बुरशीचे पांढरे चट्टे दिसतात. याची सुरुवात पानाच्या खालच्या बाजूने होते. सद्यस्थितीमध्ये सातत्याचा पाऊस व दमट हवामान असल्यामुळे दहिया रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे व्यवस्थापनपाण्याचा निचरा करावाअतिवृष्टि झालेल्या भागातील जमिनीवर साचलेले पाणी चर काढून त्वरित शेताबाहेर काढून टाकावे.आळवणीकॉपर ऑक्सिक्लोराईड (२५ ग्रॅम) + युरिया (२०० ग्रॅम) + पांढरा पोटॅश (१०० ग्रॅम) प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात द्रावण करून प्रति झाडास १०० मिलि द्रावणाची झाडाच्या मुळाशी आळवणी (ड्रेंचींग) करावी.किंवाफवारणीविकृतीची लक्षणे दिसू लागताच काही तासांत कोबाल्ट क्लोराईड १० पीपीएम (१ ग्रॅम प्रति १०० लि. पाणी) ची फवारणी द्यावी.खोडाजवाळील माती दाबणेपाणी साचलेल्या कपाशी पिकात मरग्रस्त झाडे आढळून आल्यास झुकलेली झाडे मातीचा भर देऊन सरळ करावीत. कपाशीच्या झाडांचे खोड हवेमुळे ढिले पडल्यास दोन पायाच्या मध्ये घेऊन व्यवस्थित दाबून घ्यावीत.जमिनीतील हवा खेळती ठेवणेशेतजमीन वाफशावर आल्यानंतर हलकी आंतरमशागत करून कापसाच्या मुळांना हवा खेळती ठेवावी म्हणजे झाडे लवकर पूर्ववत होतील.
वरील सर्व उपाययोजना कापसाच्या शेतामध्ये झाडे मर होत असलेली दिसताच त्वरीत (२४ ते ४८ तासाच्या आत) कराव्यात. जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल. व्यवस्थापनास जेवढा उशीर होईल तेवढा फायदेशीर परिणाम कमी होईल.
अधिक वाचा: सतत पडणाऱ्या पावसाच्या परिस्थितीत तूर, मुग व उडीद पिकांसाठी अत्यंत महत्वाचा सल्ला