lokmat Supervote 2024
Lokmat Agro >स्मार्ट शेती > ‘‘एआय’मुळे शेती उद्योगात नवचैतन्य व रोजगाराच्या संधी’

‘‘एआय’मुळे शेती उद्योगात नवचैतन्य व रोजगाराच्या संधी’

AI will bring innovation and employment opportunities to agriculture industry says prof kirankumar johare | ‘‘एआय’मुळे शेती उद्योगात नवचैतन्य व रोजगाराच्या संधी’

‘‘एआय’मुळे शेती उद्योगात नवचैतन्य व रोजगाराच्या संधी’

विज्ञान आणि पर्यावरणातील विकासाची क्षितिजे या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांचे मार्गदर्शनपर प्रतिपादन.

विज्ञान आणि पर्यावरणातील विकासाची क्षितिजे या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांचे मार्गदर्शनपर प्रतिपादन.

शेअर :

Join us
Join usNext

एआय मुळे शेती उद्योगात नवचैतन्य व रोजगार संधी निर्माण होत आहेत. भाकरी इंटरनेटवरून डाऊनलोड होत नाही. लोकसंख्या वाढ होत असताना अन्नसुरक्षितता व वातावरण बदल यामुळे पृथ्वी ग्रह पीडित बनला आहे परिणामी चंद्र, मंगळ, शुक्र, गुरू आदी ग्रहांवर मानवी वस्ती करीत मानवजात टिकविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. दहा हजार वर्षांनंतर पृथ्वीवर 3 गुणिले 10 वर 57 शुन्य इतकी लोकसंख्या असू शकते, असे प्रतिपादन  हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केले. नगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर महाविद्यालयात विज्ञान आणि पर्यावरणातील विकासाची क्षितिजे या विषयावर राष्ट्रीय  परिषदेच्या पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून ते मार्गदर्शन करीत होते.  

पुढे ते म्हणाले,‘आज जगातील 3 अब्ज लोक रोज उपाशी झोपतात आणि दररोज त्यातील 10 लाख लोक हे मृत्युमुळे कायमचे झोपी जातात. मानवजातीला फक्त शेतकरीच तारू शकतो कारण नोट दाखवून शेतात पिके उगवत नाहीत, त्यासाठी घाम गाळावा लागतो. शेतात काम करणारे मजूर मिळत नाही, मात्र एआय रोबोट व कोबोट बनविण्यासाठी रोजगाराच्या अमाप संधी आहेत. ड्रोनने शेतीतील अनेक कामे शक्य होत‌ आहेत. अडचणींवर मात करणारा ऊर्जावान सकारात्मक दृष्टीकोन  हवा. एआय‌ बरोबरच ॲडव्हान्सड इलेक्ट्रॉनिक्स  तंत्रज्ञानचा वापर मानवी जीवनासाठी अपरीहार्य गरज आहे. चांगल्यातून वाईट निर्माण होते याचा अनुभव जगाने अनेक वेळा घेतला आहे त्यामुळे सकारात्मक विकास करावा.’

मानवाच्या विकासाठी वैज्ञानिक चांगला हेतू ठेवतात, परंतु चुकीच्या लोकांनी विज्ञानातील शोधांचा गैरवापर करून संपूर्ण आज जगाला धोका निर्माण केला आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनातून राष्ट्राचे व मानवजातीचे कल्याण होईल असा मानवतावादी दृष्टिकोनातून शाश्वत विकास आवश्यक आहे. एआय तंत्रज्ञानाने नवीन रोजगार निर्माण होत आहेत.काम करण्यासाठी 10 कोटींपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध आहेत. मात्र एआय मुळे सर्व नोकऱ्या जातील अशी भिंती फक्त कामचुकार व आळशी लोकांसाठी आहे, यावरही प्रा. जोहरे यांनी प्रकाशझोत टाकला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जेष्ठ विश्वस्त सितारामाजी खिलारी हे होते. या परिषदेचे उद्घाटन जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विश्वस्त ॲडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे पाटील यांनी केले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी केले. त्यांनी संस्थेची शैक्षणिक कामगिरी सांगून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना चांगले उच्च शिक्षण मिळावे व त्यांच्यात संशोधनाची नवबिजारोपण व्हावे यासाठी या राष्ट्रीय सत्राचे आयोजन केले असा हेतू स्पष्ट केला. 

परिषदेसाठी हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांच्या जोडीने डॉ. डी आर ठूबे यांचे मार्गदर्शन सहभागी संशोधकांना लाभले. परिषद यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य वीरेंद्र धनशेट्टी समन्वयक, प्रा. नामदेव वाल्हेकर, सहसमन्वयक प्रा. शैलजा टिंगरे, कला शाखा प्रमुख डॉ विजय सुरोशी, प्रा. सविता पिंगट, व महाविद्यालाय्च्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.जीजाभाऊ घुले यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. संजय गायकवाड यांनी केले.

Web Title: AI will bring innovation and employment opportunities to agriculture industry says prof kirankumar johare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.