Join us

Agriculture News : अवकाळी पाऊसग्रस्त डाळींब बागेची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 14:59 IST

Agriculture News : पाऊस, वाऱ्याचा अंदाज लक्षात घेता डाळिंब बागेसाठी या उपाययोजना करता येतील.

Agriculture News :  सद्यस्थितीत या आठवड्यात पावसाची शक्यता (Rain) वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पाऊस, वाऱ्याचा अंदाज लक्षात घेता पिकांचे संरक्षण महत्वाचे आहे. त्यानुसार डाळिंब बागेतील (Dalimb Farm) जास्तीचे पाणी काढून टाकावे व जमिनीवर पडलेला काडीकचरा, पालापाचोळा व खराब / सडलेली फळे गोळाकरून नष्ट करून बागेला स्वच्छ ठेवावे, यासह कोणत्या उपाययोजना कराव्यात, हे जाणून घेऊयात.... 

अवकाळी पाऊसग्रस्त बागेचे व्यवस्थापन

  • अवकाळी पाऊसग्रस्त बागेचे व्यवस्थापन फुलधारणा, फळधारणेस सुरुवात प्रादुर्भावित, इजा झालेल्या फुलकळ्या किंवा फळे काढून टाकावीत. 
  • शिफारशीप्रमाणे फवारणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. 
  • अधिक फुल आणि फळधारणेसाठी थोडीशी वाट पहावी. 
  • समाधानकारक फुले व फळधारणा दिसल्यास शिफारशीप्रमाणे एकात्मिक रोग-कीड व्यवस्थापन करून बहर चालू ठेवावा. 
  • अन्यथा बाग विश्रांतीवर ठेवावी. पुढील पीक हंगामासाठी, बहराची तयारी करावी. 
  • सर्व फळांचे नुकसान, फांद्या तुटणे / चिरणे सर्व नुकसानग्रस्त फळे काढावीत. 
  • तुटलेल्या, चिरलेल्या फांद्या छाटून बागेबाहेर खड्यामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात. 
  • छाटलेल्या फांद्या, खोडांवर बोर्डो पेस्ट लावावी. 
  • त्यानंतर १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. 
  • खतांचा हलका डोस भरून बागेला विश्रांती अवस्थेत ठेवावे. 
  • पुढील बहराची तयारी करावी.

विश्रांती अवस्थेतील बाग

  • विश्रांती अवस्थेतील बाग सर्व नुकसानग्रस्त, तुटलेल्या, चिरलेल्या फांद्या छाटाव्यात.
  • बागेबाहेर खड्यामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात. छाटलेल्या फांद्यांना, खोडांवर बोर्डो पेस्ट लावावी. 
  • त्यानंतर १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. 
  • विश्रांती अवस्थेत खत व्यवस्थापन केले नसल्यास खतांचा डोस देऊन घ्यावा. 
  • शिफारशीप्रमाणे विश्रांती अवस्थेतील एकात्मिक रोग- कीड व्यवस्थापन करावे.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी  

टॅग्स :डाळिंबशेती क्षेत्रशेतीहवामानपाऊस