Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Vegetbale Farming : वेल वर्गीय भाजीपाला पिकांतील सद्यस्थितीतील कीड नियंत्रण कसे करावे?  

Vegetbale Farming : वेल वर्गीय भाजीपाला पिकांतील सद्यस्थितीतील कीड नियंत्रण कसे करावे?  

Latest News Vegetbale Farming How to control current pest situation in vegetable crops | Vegetbale Farming : वेल वर्गीय भाजीपाला पिकांतील सद्यस्थितीतील कीड नियंत्रण कसे करावे?  

Vegetbale Farming : वेल वर्गीय भाजीपाला पिकांतील सद्यस्थितीतील कीड नियंत्रण कसे करावे?  

Vegetbale Farming : कारली, पडवळ, दुधी भोपळा, दोडका या पिकांवर तांबडे भुंगेरे, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.

Vegetbale Farming : कारली, पडवळ, दुधी भोपळा, दोडका या पिकांवर तांबडे भुंगेरे, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.

Vegetbale Farming :  वेलवर्गीय भाजीपाला फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी फुले येण्याच्या काळात 'क्यू ल्यूर' कामगंध सापळे एकरी ५ या प्रमाणात मंडपात लावावेत. 


फळांची काढणी योग्य पक्वतेस करावी. प्रादुर्भावग्रस्त फळांमधून फळमाशीची उत्पत्ती वाढत असल्याने अशी फळे गोळा करून नष्ट करावीत. वेलांखालील माती वेळोवेळी हलवून घ्यावी.

कारली, पडवळ, दुधी भोपळा, दोडका या पिकांवर तांबडे भुंगेरे, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. यासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरॅक्टीन (३०० पीपीएम) ५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

रोग नियंत्रण

  • काळा करपा, केवडा (डाऊनी मिल्ड्यू) रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी अमिटोक्ट्रॅडीन (२७%) + डायमिथोमॉर्फ (२०.२७% एससी) २ मिली किंवा बेनालॅक्सिल (४%) + मॅन्कोझेब (६५% डब्लूपी) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
  • आवश्यकतेनुसार पुढील फवारणी १० दिवसांच्या अंतराने करावी. भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल १ मि.ली. किंवा मेप्टिलडीनोकॅप ०.७ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारावे.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय सेवा केंद्र, इगतपुरी 

Web Title : बेल वाली सब्जियों की खेती: कीट और रोग नियंत्रण

Web Summary : वेल वाली सब्जियों को फल मक्खियों से बचाने के लिए फेरोमोन जाल का उपयोग करें। नीम के तेल से भृंग, एफिड्स और व्हाइटफ्लाइज़ को नियंत्रित करें। उचित कवकनाशी का छिड़काव करके डाउनी मिल्ड्यू और पाउडरी मिल्ड्यू से मुकाबला करें। स्वस्थ फसलें बनाए रखें।

Web Title : Vine Vegetable Farming: Effective Pest and Disease Control Strategies

Web Summary : Protect vine vegetables from fruit flies using pheromone traps. Control beetles, aphids, and whiteflies with neem oil. Combat downy mildew and powdery mildew by spraying appropriate fungicides. Maintain healthy crops.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.