Lokmat Agro >स्मार्ट शेती > Food License : फूड लायसन्स काढण्यासाठी किती रुपये शुल्क? कोणती कागदपत्रे आवश्यक? वाचा सविस्तर 

Food License : फूड लायसन्स काढण्यासाठी किती रुपये शुल्क? कोणती कागदपत्रे आवश्यक? वाचा सविस्तर 

Latest News How much rupees fee for food license and what document required Read in detail | Food License : फूड लायसन्स काढण्यासाठी किती रुपये शुल्क? कोणती कागदपत्रे आवश्यक? वाचा सविस्तर 

Food License : फूड लायसन्स काढण्यासाठी किती रुपये शुल्क? कोणती कागदपत्रे आवश्यक? वाचा सविस्तर 

Food License : एखाद्याला छोटा व्यवसाय करायचा असल्यास फूड लायसन्स (Food License) काढणे आवश्यक असते.

Food License : एखाद्याला छोटा व्यवसाय करायचा असल्यास फूड लायसन्स (Food License) काढणे आवश्यक असते.

शेअर :

Join us
Join usNext

Food License : एखाद्याला छोटा व्यवसाय (Small Business) करायचा असल्यास फूड लायसन्स काढणे आवश्यक असते. कारण एखाद्या ठिकाणी स्टॉल लावून व्यवसाय करावा लागतो. संबधित  व्यावसायिकाकडे फूड लायसन्स असणे अनिवार्य आहे. त्यातही तीन प्रकार पडतात. जर एखाद्याला मूलभूत म्हणजेच प्रारंभीची नोंदणी करायची असल्यास कशी करायची? याबाबत जाणून घेऊयात... 

ज्यांची वार्षिक उलाढाल १२ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांनी परवाना घेणे आवश्यक आहे. ज्या अन्न व्यावसायिकांची  (FSSAI) वार्षिक उलाढाल १२ लाखांच्या आत आहे, त्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून केले आहे. दुकान नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. नोंदणी केल्याशिवाय कुणालाही दुकानदारी करता येणार नाही, असे शासनाचे नियम आहेत.  अन्न व औषध प्रशासनाच्या  https://foscos.fssai.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकता. 

मूलभूत परवाना कुणासाठी

वार्षिक उलाढाल रु. १२ लाखांपेक्षा जास्त नसलेली कोणतीही व्यक्ती
अन्न उत्पादनांमध्ये व्यवहार करणारा किरकोळ विक्रेता.
कोणतीही व्यक्ती जी स्वत: कोणतेही खाद्यपदार्थ तयार करते किंवा विकते.
तात्पुरत्या स्टॉलधारकाकडून खाद्यपदार्थांची विक्री केली जाते.
केटरर वगळता कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक मेळाव्यात अन्न वाटप करणारी कोणतीही व्यक्ती.
अन्न व्यवसाय आणि खालील गोष्टींमध्ये व्यवहार करणारे लघु किंवा कुटीर उद्योग


मूलभूत नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे 

  • फूड बिझनेस ऑपरेटर्सचा फोटो ओळख पुरावा.
  • व्यवसाय संविधान प्रमाणपत्र, म्हणजे भागीदारी करार, निगमन प्रमाणपत्र, दुकान आणि स्थापना परवाना किंवा इतर व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र.
  • व्यवसायाच्या जागेच्या ताब्याचा पुरावा, म्हणजे भाडे करार, भाड्याने घेतलेल्या जागेच्या मालकाकडून एनओसी, युटिलिटी बिले इ.
  • अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली योजना.
  • उत्पादित किंवा प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांची यादी.
  • बँक खात्याची माहिती.

 

विविध प्रकारच्या नोंदणीसाठी FSSAI नोंदणी शुल्क 

FSSAI मूलभूत नोंदणी – १०० रुपये शुल्क (वार्षिक उलाढाल १२ लाखांच्या आत)
FSSAI राज्य परवाना - २ हजार ते ३ हजारच्या दरम्यान शुल्क (वार्षिक उलाढाल १२ लाखांपेक्षा जास्त)
FSSAI केंद्रीय परवाना – ७ हजार ५०० रुपये शुल्क पासून पुढे 

- अन्न व औषध प्रशासन विभाग, नाशिक 

Web Title: Latest News How much rupees fee for food license and what document required Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.