Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >लै भारी > Success Story : आधुनिक तंत्रज्ञानाने तारलं, वर्ध्यातील शेतकऱ्याचा भुईमुंगाचा यशस्वी प्रयोग

Success Story : आधुनिक तंत्रज्ञानाने तारलं, वर्ध्यातील शेतकऱ्याचा भुईमुंगाचा यशस्वी प्रयोग

Latest News Cultivation of groundnut crop using modern technology by wardha farmer | Success Story : आधुनिक तंत्रज्ञानाने तारलं, वर्ध्यातील शेतकऱ्याचा भुईमुंगाचा यशस्वी प्रयोग

Success Story : आधुनिक तंत्रज्ञानाने तारलं, वर्ध्यातील शेतकऱ्याचा भुईमुंगाचा यशस्वी प्रयोग

Groundnut Farming : शेतकरी पुंडलिक डुकसे यांनी आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञान वापरून भुईमुगाचे विक्रमी उत्पादन घेतले.

Groundnut Farming : शेतकरी पुंडलिक डुकसे यांनी आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञान वापरून भुईमुगाचे विक्रमी उत्पादन घेतले.

वर्धा : निसर्गाचा लहरीपणा, नापिकीमुळे दिवसेंदिवस शेतीला अवकळा आली आहे. कोरडवाहू शेतीचे दिवस संपत आल्यासारखे दिसत आहे. परंपरागत असलेले सोयाबीन, कापूस (cotton) आदी शेतमालाला रास्त भाव न मिळाल्याने शेतकरी हतबल झाले आहे. या सर्व बाबींवर पर्याय शोधत वर्धा (wardha) जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील गोविंदपूर येथील प्रगतिशील शेतकरी पुंडलिक डुकसे यांनी आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञान वापरून भुईमुगाचे विक्रमी उत्पादन घेतले.

निसर्गाची अवकृपा नापिकी कर्जबाजारी यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. तर उत्पादनाचे खर्च प्रमाण वाढल्याने व शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने कोरडवाहू शेती (farming) न केलेली बरी अशी शेतकरी चर्चा करताना दिसत आहेत. या बाबीवर गोविंदपूर येथील शेतकरी शेतकरी पुंडलिक डुकसे यांनी शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भुईमूग पिकाची लागवड केली. भुईमूग तीन महिन्यांचे उन्हाळी पीक आहे. त्याला खर्च कमी येतो आणि उत्पन्नही चांगले होते. सध्या भुईमुगाला बाजारपेठेत सहा हजार रुपये भाव मिळत आहे.

पुंडलिक डुकसे यांना एका एकरात १५ क्विंटल भुईमुगाचे उत्पादन झाले. शेतकऱ्याने कापूस, सोयाबीन, गहू, चणा पिकांसोबत आधुनिक शेती केल्यास शेतकऱ्याचे उत्पादन वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

भुईमुगाला काय भाव? 

भुईमूग ओली शेंग भाव                                                                                                                                                                              आज अकलूज बाजार समिती भुईमुगाच्या ओल्या शेंगास क्विंटल मागे 04 हजार 500 रुपये, अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये क्विंटल मागे 3750 रुपये, जळगाव बाजार समितीत 4500 रुपये, पुणे मांजरी बाजार समिती 5200 रुपये तर भुसावळ बाजार समितीत 05 हजार रुपयांचा दर मिळाला. 

भुईमूग सुकी शेंग भाव
आज भुईमुगाच्या सुक्या शेंगास्विंटल मागे लासलगाव निफाड बाजार समितीमध्ये 5000 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजार समिती 4200 रुपये, सावनेर बाजार समिती 4948 रुपये, धुळे बाजार समितीत 05 हजार पाचशे रुपये, अमरावती बाजार समिती 5750 रुपये असा दर मिळाला.

Web Title: Latest News Cultivation of groundnut crop using modern technology by wardha farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.