Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > सावधान! तापमान वाढतंय; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमान ४२ ते ४४ अंशांच्या घरात जाण्याची शक्यता

सावधान! तापमान वाढतंय; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमान ४२ ते ४४ अंशांच्या घरात जाण्याची शक्यता

Beware! The temperature is rising; The temperature in Madhya Maharashtra Marathwada is likely to go up to 42 to 44 degrees | सावधान! तापमान वाढतंय; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमान ४२ ते ४४ अंशांच्या घरात जाण्याची शक्यता

सावधान! तापमान वाढतंय; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमान ४२ ते ४४ अंशांच्या घरात जाण्याची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्रात तापमान वाढतंय, पुढील दोन दिवसात..

कोकण, मध्य महाराष्ट्रात तापमान वाढतंय, पुढील दोन दिवसात..

राज्यात विविध भागात पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी कोकण किनारपट्टीवर उष्ण व दमट वातावरण असून नागरिक घामाच्या धारांनी हैराण झाले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या विशेष तापमान बुलेटीननुसार, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडयात कमाल तापमान ४२ ते ४४ अंशाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमानाची काल नोंद झाली.

उत्तर कोकणात कमाल तापमान ३५ ते ३८ दरम्यान होते. तर तळ कोकणात ३४ ते ३६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात सध्या पावसाला पोषक वातावरण असल्याने बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण होते. सामान्य तापमानाच्या तुलनेत मराठवाड्यात काल कमी तापमानाची नोंद झाली असून कमाल तापमान ३७ ते ४० अंशांपर्यंत होते.

दरम्यान, नाशिक, जळगाव तसेच विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ४० पार गेल्याचे दिसून आले. काल नाशिक, मुंबई भागात लोकसभा निवडणूकीचे मतदान असल्याने भर उन्हात नागरिकांना थांबावे लागले.

पुढील दोन दिवसात…

हवामान विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार पुढील दोन दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होणार असून २ ते ३ अंशांनी तापमान वाढून पुन्हा तापमान घसरण्याचा अंदाज देण्यात आला आहे.

उत्तर कोकणात आजपासून तापमान वाढणार असून रायगड, ठाणे परिसरात उष्ण वातावरण असेल. मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात कमाल तापमान ४२ ते ४४ अंशांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात येत्या दोन दिवसात फार तापमानात फरक जाणवणार नाही. मात्र, त्यानंतर २ ते ३ अंशांनी तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागरिकांनी भर उन्हात बाहेर जाणे टाळावे तसेच भरपूर पाणी पित राहण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Web Title: Beware! The temperature is rising; The temperature in Madhya Maharashtra Marathwada is likely to go up to 42 to 44 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.