Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Bakery Business : बेकरी व्यवसाय सुरु करायचाय? ह्या ठिकाणी सुरु होतंय प्रशिक्षण; वाचा सविस्तर

Bakery Business : बेकरी व्यवसाय सुरु करायचाय? ह्या ठिकाणी सुरु होतंय प्रशिक्षण; वाचा सविस्तर

Bakery Business : Want to start a bakery business? Training is starting here; Read in detail | Bakery Business : बेकरी व्यवसाय सुरु करायचाय? ह्या ठिकाणी सुरु होतंय प्रशिक्षण; वाचा सविस्तर

Bakery Business : बेकरी व्यवसाय सुरु करायचाय? ह्या ठिकाणी सुरु होतंय प्रशिक्षण; वाचा सविस्तर

Bakery Training महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, अहिल्यानगर अंतर्गत अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग यांचेकडून बेकरी व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

Bakery Training महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, अहिल्यानगर अंतर्गत अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग यांचेकडून बेकरी व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, अहिल्यानगर अंतर्गत अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग यांचेकडून बेकरी व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणात कोणकोणते पदार्थ शिकवले जाणार तसेच प्रशिक्षण कालावधी, प्रशिक्षण शुल्क किती? याविषयी माहिती पाहूया.

प्रशिक्षण कालावधी
दि. ०६ ते १० जानेवारी, २०२५ (५ दिवस)
वेळ स. १०.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत

प्रवेश मर्यादा
२५ (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य)

प्रशिक्षण शुल्क
दि. ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत नोंदणीस रु. ४,०००/- व तदनंतर रु. ४,५०० राहील.

प्रशिक्षणात शिकविले जाणारे प्रक्रिया पदार्थ
ब्रेड, नानकटाई, नाचणी (नागली) बिस्कीट, बनपाव, लादीपाव, टोस्ट, सुरती (जिरा) बटर व कपकेक इत्यादी.

प्रशिक्षणात आणखी काही शिकविले जाणारे विषय
• बेकरी व्यवसाय कसा सुरु करावा?
अन्न सुरक्षितता व मानके कायदयाची माहिती आणि बेकरी उद्योगाची नोंदणी कशी करावी?
• बेकरी उद्योगासाठी लागणारी मशिनरी व त्यांची देखभाल कशी करावी?
• बेकरी पदार्थांचे पॅकेजिंग मार्केटींग कसे करावे?
• बेकरी उद्योगासाठी शासनाच्या कोणत्या कर्ज योजना/अनुदान आहेत?
• बेकरी उद्योगातील अडचणी कोणकोणत्या आहेत? त्यावर उपाययोजना काय आहेत?
• बेकरी उद्योगाचे व्यवस्थापन कसे करावे? याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.

प्रशिक्षण ठिकाण
बेकरी युनिट, मध्यवर्ती परिसर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी.

प्रवेश शुल्क कुठे भराल?
लेखा व अधिदान अधिकारी, मफुकृवि, राहुरी यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया बँक खाते क्र: 38817479754 IFSC Code: SBIN0003239 वर शुल्क जमा करावे व त्याचा स्क्रिन शॉट कार्यालय प्रतिनिधी श्रीमती. सविता धनवडे 9421187540 यांच्या मोबाईलवर पाठवावा.

अधिक माहितीसाठी संपर्क
(02426) 243259

Web Title: Bakery Business : Want to start a bakery business? Training is starting here; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.