Join us
Daily Top 2Weekly Top 5

Harbhara Market : हरभरा हमीभाव गाठणार का, फेब्रुवारीचे उर्वरित 20 दिवस कसे असतील दर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 19:40 IST

Harbhara Market : मार्च ते मे हा हरभऱ्याचा प्रमुख विक्री हंगाम असतो. सध्या फेब्रुवारी महिन्यात दर कसे राहतील, ते सविस्तर पाहुयात... 

Harbhara Market : मार्च ते मे हा हरभऱ्याचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्षी नोव्हेंबरमध्ये हरभऱ्याची आवक कमी झालेली आहे. जानेवारी २०२६ मध्ये ती ०.८ लाख टन इतकी आहे, जी मागील महिन्यात ०.४ लाख टन इतकी होती. सध्या फेब्रुवारी महिन्यात दर कसे राहतील, ते सविस्तर पाहुयात... 

रब्बी हंगाम २०२४-२५ साठी हरभऱ्याची सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत ५ हजार ६५० रुपये प्रति क्विंटल इतकी आहे. सध्याच्या किंमती भारत सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत.

मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील हरभऱ्याच्या फेब्रुवारी मधील सरासरी किंमती - 

  • फेब्रुवारी २०२३ मध्ये ४७२४ रुपये प्रति क्विंटल, 
  • फेब्रुवारी २०२४ मध्ये ६ हजार ३२ रुपये प्रति क्विंटल
  • फेब्रुवारी २०२५ मध्ये ५ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटल
  • फेब्रुवारी २०२६ मध्ये संभाव्य किंमती ५ हजार ते ५ हजार ४९० रुपये प्रति क्विंटल राहतील, अशी शक्यता आहे. 

 

हरभरा हे रब्बी पिक असून त्याची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंवर व काढणी मार्च ते एप्रिल या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ मध्ये हरभऱ्याचे उत्पादनात सुमारे १११.१ लाख टन वाढ दिसून येते. महाराष्ट्रातील हरभऱ्याचे उत्पादन सन २०२४-२५ मध्ये २९.६ लाख टन आहे.

- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील 'बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा' अंतर्गत शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून फेब्रुवारी २०२६ या कालावधीसाठी हरभरा पिकाच्या संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chickpea Market: Will prices reach support? February outlook.

Web Summary : Chickpea prices are currently below the government's support price. February 2026 prices are expected to range from ₹5,000 to ₹5,490 per quintal. India's chickpea production is estimated to increase to 111.1 lakh tonnes in 2024-25.
टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डकृषी योजनासोयाबीन