Join us

राज्यातील बाजारात मूग दरात कुठे तेजी? कुठे मंदी; वाचा आजचे मूग बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 17:39 IST

Mung Bajar Bhav : राज्यात आज मंगळवार (दि.०२) सप्टेंबर रोजी एकूण १७३२ क्विंटल मुगाची आवक झाली होती. ज्यात ९२० क्विंटल चमकी, ७०० क्विंटल हिरवा, ८९ क्विंटल लोकल, ०७ क्विंटल मोगली मूग वाणांचा समावेश होता. 

राज्यात आज मंगळवार (दि.०२) सप्टेंबर रोजी एकूण १७३२ क्विंटल मुगाची आवक झाली होती. ज्यात ९२० क्विंटल चमकी, ७०० क्विंटल हिरवा, ८९ क्विंटल लोकल, ०७ क्विंटल मोगली मूग वाणांचा समावेश होता. 

चमकी वाणाच्या मुगाला आज सर्वाधिक आवकेच्या जालना बाजारात कमीत कमी ४३०० तर सरासरी ६२०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. तसेच जळगाव येथे ८०००, वाशिम-अनसिंग येथे ५६५०, पैठण येथे ४५००, मलकापूर येथे ७०११, शिरपूर येथे ९९७६, औराद शहाजानी येथे ६२५० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

हिरवा वाणाच्या मुगाला आज सर्वाधिक आवकेच्या माजलगाव बाजारात कमीत कमी ६००० तर सरासरी ७४०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. तसेच सोलापूर येथे ५६००, पुणे येथे ९४५०, चोपडा येथे ९३५३, चिखली येथे ५९००,  हिंगणघाट येथे ६०००, वणी येथे ५८००, शेवगाव - भोदेगाव येथे ६६००, गंगापूर येथे ७०००, औराद शहाजानी येथे ५७७५, कळंब (धाराशिव) येथे ६५००, मुरुम येथे ७२३३, तुळजापूर येथे ८००० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

लोकल वाणाच्या मुगाला आज नागपूर येथे ६५५०, जामखेड येथे ७५००, तुळजापूर येथे १०००० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. तर अमरावती येथे मोगली वाणाच्या मुगाला ६७५०, दोंडाईचा येथे ७५०१ रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

'त्या' मुगाचा फटका 

यंदा राज्यात मूग काढणी अंतिम टप्प्यात असतांना सतत पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मूग काळवंडले आहेत. त्यामुळे बाजारात चांगल्या दर्जाच्या मुगाला देखील यामुळे फटका बसत असल्याचे व्यापारी सांगतात.    

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील मूग आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/09/2025
दोंडाईचा---क्विंटल16400080007501
जालनाचमकीक्विंटल419430075006200
जळगावचमकीक्विंटल4800080008000
वाशीम - अनसींगचमकीक्विंटल15555058505650
पैठणचमकीक्विंटल3420146014500
मलकापूरचमकीक्विंटल29440084507011
शिरपूरचमकीक्विंटल424350099769976
औराद शहाजानीचमकीक्विंटल26550170006250
सोलापूरहिरवाक्विंटल15470066005600
पुणेहिरवाक्विंटल36900099009450
चोपडाहिरवाक्विंटल40735293539353
चिखलीहिरवाक्विंटल10540064005900
माजलगावहिरवाक्विंटल213600082007400
हिंगणघाटहिरवाक्विंटल16550066006000
वणीहिरवाक्विंटल7580058005800
शेवगाव - भोदेगावहिरवाक्विंटल5550066006600
गंगापूरहिरवाक्विंटल61485174007000
औराद शहाजानीहिरवाक्विंटल169530062505775
कळंब (धाराशिव)हिरवाक्विंटल50490178016500
मुरुमहिरवाक्विंटल8680080007233
तुळजापूरहिरवाक्विंटल70600083008000
नागपूरलोकलक्विंटल15640066006550
जामखेडलोकलक्विंटल14700080007500
तुळजापूरलोकलक्विंटल6090001250010000
अमरावतीमोगलीक्विंटल7650070006750

टिप : वरील सर्व आकडेवारी केवळ सोमवार (दि.०२) रोजी सायंकाळी ०५ पर्यंतची आहे. 

हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र 

टॅग्स :बाजारशेती क्षेत्रशेतकरीशेतीमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती