Join us

Kapus Market : ऑगस्ट 2025 मध्ये कापसाला प्रति क्विंटल काय भाव मिळतील? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 18:45 IST

Kapus Market : ऑगस्ट महिना सुरु असून या महिन्यात कापसाला काय दर मिळू शकतात, याचा एक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Kapus Market : खरीप हंगाम २०२४-२५ साठी मध्यम धाग्याच्या कापूस पिकाची (Cotton MSP) किमान आधारभूत किंमत (MSP) ७ हजार १२१ प्रति क्विंटल इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. देशात चालू वर्षीच्या जून २०२५ मध्ये कापसाची आवक मागील वर्षीच्या जून २०२४ च्या तुलेनत ५७.०६ टक्क्यांनी घटली आहे.

तर माहे जुलै २०२५ ची किंमत दि. २० जुलैपर्यंतची आहे. मागील तीन वर्षातील राजकोट बाजारातील (Rajkot Cotton Market) कापसाच्या ऑगस्ट महिन्यातील सरासरी किंमती पाहिल्या तर ऑगस्ट २०२२ मध्ये १० हजार ५७८ रुपये प्रति क्विंटल, ऑगस्ट २०२३ मध्ये ७ हजार ६५६ रुपये प्रति क्विंटल, ऑगस्ट २०२४ मध्ये ७ हजार ६६९ प्रति क्विंटल रुपये होती. 

तर ऑगस्ट २०२५ या कालावधीसाठी कापसाच्या किमती अंदाजे ७ हजार ९५० ते ८ हजार ४५५ प्रति क्विंटल राहतील. केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या तिसऱ्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण कापसाचे उत्पादन मागील वर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत १४.७५ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.

आयात, निर्यात कशी राहील? २०२४-२५ मध्ये जागतिक उत्पादन १२०२ लक्ष गाठीपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. एकूणच, गेल्या महिन्यात आर्थिक दृष्टीकोन सुधारला असूनही २०२४-२५ विपणन वर्षासाठी जागतिक कापसाच्या मागणीचा दृष्टीकोन काहीसा नकारात्मक आहे. 

राष्ट्रीय आयात आणि निर्यातीच्या बाबतीत, मागील वर्षाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये आयातीत आणि निर्यातीत वाढ होण्याचा अंदाज आहे. हाच कल जागतिक पातळीवर दिसला असून मागील वर्षीच्या तुलनेत आयात व निर्यातीमध्ये सरासरी ६% वाढ झाली आहे.

- - मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा अंतर्गत" शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून ऑगस्ट २०२५ या कालावधीसाठी कापूस पिकाचा संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.

टॅग्स :कापूसशेती क्षेत्रमार्केट यार्डकृषी योजना